खेळ

June 23, 2025 9:59 AM

views 7

पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताला २७ पदकं

थायलंडमध्ये पार पडलेल्या दिव्यांगांसाठीच्या पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी २७ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये ४ सुवर्ण, १० रौप्य आणि १३ कास्य पदकांचा समावेश आहे. पदक विजेत्यांमध्ये पॅरिस पॅरालिम्पिक पदक विजेते क्रिडापटू नितेश कुमार, थुलासिमथी मुरुगेसन आणि मनीषा रामदास यांचा समावेश ...

June 22, 2025 2:49 PM

views 29

ITF J200 Gladbeck टेनिस स्पर्धेत भारताच्या माया राजेश्वरनला विजेतेपद

भारताची युवा टेनिसपटू माया राजेश्वरन हिनं जर्मनीत आयोजित आईटीएफ कनिष्ठ गट दोनशे, ग्लेडबेक टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. सोळा वर्षीय मायानं अंतिम फेरीत स्वित्झर्लंडच्या नोलिया मान्तान हिचा ६-२, ६-४ असा सहज पराभव केला. मायाचं आईटीएफ कनिष्ठ गट स्पर्धेतलं हे पहिलंच विजेतेपद आहे.

June 21, 2025 3:17 PM

views 31

तेंडुलकर-अँडरसन चषक क्रिकेट कसोटी मालिकेतील सामन्यात भारताची दमदार सुरुवात

इंग्लंडमधल्या हेडींग्ले इथं कालपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात तेंडुलकर-अँडरसन चषक क्रिकेट कसोटी मालिकेला सुरुवात झाली. पाच सामन्यांच्या या मालिकेतल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी भारताच्या ३ बाद ३५९ धावा झाल्या आहेत. तत्पूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घ...

June 21, 2025 10:44 AM

views 43

पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये पुरूषांच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने विजयी

भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये पुरूषांच्या भालाफेक स्पर्धेत विजय मिळवला. ऑलिम्पिकविजेत्या चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88 पूर्णांक 16 मीटर फेक करत विजेतेपदाला गवसणी घातली. जर्मनीचा ज्युलियन वेबर दुसऱ्या तर ब्राझीलचा लुईस मॉरिसियो तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

June 20, 2025 8:15 PM

views 37

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांची दमदार सुरुवात

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तेंडुलकर-अँडरसन चषक पाच कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज इंग्लंडमधे लीड्स इथं  हेडिंग्ले मैदानावर सुरु झाला. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे.    भारताचा धावसंख्या ९१ झाली असताना के एल राहुल ४२ धावांवर बाद झाला, तर त्यानंतर ...

June 20, 2025 1:38 PM

views 18

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तेंडुलकर-अँडरसन चषक क्रिकेट कसोटी मालिका आजपासून होणार सुरु

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तेंडुलकर-अँडरसन चषकाच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिली क्रिकेट कसोटी आज इंग्लंडमधल्या हेडिंग्ले, लीड्स इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता सुरू होईल. नवनियुक्त भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. दरम्यान, काल अन...

June 20, 2025 10:05 AM

views 28

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचं केलं अभिनंदन

लंडनमधील वर्ल्ड टीम ब्लिट्झ अजिंक्यपदस्पर्धेत उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची खेळाडू असलेल्या हौ यिफान हिला पराभूत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचं अभिनंदन केलं आहे. दिव्याचं हे यश तिच्या धैर्य आणि दृढनिश्चयाला अधोरेखि...

June 19, 2025 9:17 AM

views 8

आशियाई स्क्वाश अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय वेलावन सेंथिलकुमार याचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

मलेशियात सुरू असलेल्या आशियाई स्क्वाश अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा वेलावन सेंथिलकुमारनं जपानचा टोमोटाका एंडोचा तीन-शून्य असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा हा एकमेव खेळाडू आहे. यापूर्वी सूरज चांद, आकांक्षा साळुंखे आणि शमीना रियाझ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

June 18, 2025 2:20 PM

views 21

जर्मनी इथे होणाऱ्या हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारताचा कनिष्ठ पुरुष हॉकी संघ बेंगळुरूहून रवाना

जर्मनी इथे होणाऱ्या ४ राष्ट्रांच्या हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज भारताचा कनिष्ठ पुरुष हॉकी संघ बेंगळुरूहून रवाना झाला. कर्णधार अराईजित सिंह हुंडल याच्या नेतृत्वाखाली हा संघ येत्या २१ जून रोजी यजमान जर्मनी संघाबरोबर लढत देईल. त्यानंतर २२ जून रोजी ऑस्ट्रेलिया आणि २४ जून रोजी स्पेनशी या संघाचा सा...

June 18, 2025 2:13 PM

views 28

क्रिकेट – हर्षित राणा याचा राखीव खेळाडूंमधे समावेश

इंग्लंडविरोधात होणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघात जलदगती गोलंदाज हर्षित राणा याचा राखीव खेळाडूंमधे समावेश झाला आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल रात्री ही घोषणा केली. हर्षित राणाने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध कसोटी क्रिकेटमधे पदार्पण केलं होतं. त्याने आतापर्यंत दोन कसोटी...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.