सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या जोडीनं आज उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी इंडोनेशियाच्या साबर कार्यमान गुटामा आणि मोह रेझा पेहलवी इस्फहानी या जोडीचा १९-२१, २१-१६, २१-१९ असा पराभव केला.
पुढच्या फेरीत मलेशियाच्या बॅडमिंटनपटूंशी त्यांची गाठ पडेल. उपउपान्त्यपूर्व फेरीत पुरुष एकेरीत एच एस प्रणॉयला तर महिला एकेरीत पी व्ही सिंधूला पराभव पत्करावा लागला.