आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीत आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे.
यातला विजेता संघ १ जून रोजी पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाबरोबर खेळेल. आणि त्या सामन्यातील विजेता संघ ३ जूनला अहमदाबादमध्ये अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी लढत देईल.