आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत गुलवीर सिंगने दुसरे सुवर्णपदक जिंकल्यामुळे भारताने देशांच्या पदकतालिकेत आघाडी घेतली आहे. भारत सध्या आठ सुवर्ण, सात रौप्य आणि तीन कांस्यपदक म्हणजेच एकूण १८ पदकांसह पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. तर चीन १५ सुवर्ण, आठ रौप्य आणि तीन कांस्यपदक म्हणजेच एकूण २४ पदकांसह पदकतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.
गुलवीरने पुरुषांच्या ५ हजार मीटर शर्यतीत १३ मिनिटे २४ सेंकद ७८ मिनिट सेंकद अशा विक्रमी वेळेत विजेतेपद पटकावलं. यापूर्वी त्याने या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी १० हजार मीटर शर्यतीत पहिलं सुवर्णपदक जिंकलं होतं.
महिलांच्या उंच उडीत, १८ वर्षीय पूजाने हंगामातील सर्वोत्तम १ मीटर ८९ सेंटीमीटर अशी उंच उडी मारून सुवर्णपदक जिंकलं आणि २० वर्षांखालील तिचा राष्ट्रीय विक्रम मोडला. बॉबी अलॉयसियसनंतर आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक मिळवणारी ती दुसरी भारतीय ठरली.
त्यानंतर नंदिनी अगासराने महिलांच्या हेप्टाथलॉनमध्ये ५ हजार ९४१ गुणांसह सुवर्णपदक जिंकून आजच्या दिवसाचं तिसरं सुवर्णपदक पटकावलं.
पारुल चौधरीने महिलांच्या ३हजार मीटर स्टीपलचेसमध्ये ९ मिनिटे १२ सेंकद ४६ मिनि सेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकलं. अनिमेश कुजूरने २० मिनिटे ८१ सेकंदांसह पुरूषांच्या २०० मीटर स्पर्धेत उपांत्य फेरीत दुसरे स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.