आंतरराष्ट्रीय

January 24, 2026 6:27 PM

views 62

युरोपीय संघाच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डेअर लाईएन यांचं भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन

युरोपीय संघाच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डेअर लाईएन यांचं आज दुपारी भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झालं. येत्या सोमवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात युरोपीय मंडळाचे अध्यक्ष अंतोनियो लुईश सांतूश दा कोस्ता यांच्यासोबत त्या प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होतील. लाईएन यांच्या या दौऱ्यात भारत आणि युरो...

January 24, 2026 6:16 PM

views 39

इंडोनेशियात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यानं ७ जणांचा मृत्यू

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रान्तात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यानं ७ जणांचा मृत्यू तर सुमारे ८२ लोक बेपत्ता झाले आहेत. या भागात आठवडाभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात आली आहे.  

January 24, 2026 5:57 PM

views 15

रशियाने युक्रेनवर केेलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

रशियाने युक्रेनवर काल रात्री केेलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले आहेत. दोन्ही देशातला संघर्ष थांबवण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटीच्या पार्श्वभूमीवर अबुधाबी इथं चर्चा सुरू असतानाच हा हल्ला झाला.  युक्रेन आणि रशिया यांच्यातला हा संघर्ष थांबावा यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेली...

January 24, 2026 3:24 PM

views 19

भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यात दुहेरी सामाजिक सुरक्षा आकारणी रद्द करण्यासाठीच्या करारासंदर्भात चर्चा

भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यात दुहेरी सामाजिक सुरक्षा आकारणी रद्द करण्यासाठीच्या करारासंदर्भात आज नवी दिल्ली इथं चर्चा झाली. २१ आणि २२ जानेवारी रोजी झालेल्या या चर्चेला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव पी. एस. गंगाधर आणि यूकेच्या राष्ट्रीय विमा धोरण विभागाचे उपसंचालक एडमंड हेअर उपस्थित ...

January 23, 2026 7:54 PM

views 29

दावोसमध्ये यंदा राज्याचे ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार-उदय सामंत

दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीतून राज्यात ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. त्यातून ४० ते ४२ लाख रोजगारांची निर्मिती होईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली.    दावोसमध्ये एकूण ५१ करार झाले असून, त्यापैकी साडे १६ लाख कोटी रु...

January 23, 2026 1:28 PM

views 50

जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका औपचारिकरीत्या बाहेर

जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा अमेरिकने केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि आरोग्यमंत्री रॉबर्ट केनेडी यांनी संयुक्त निवेदन जारी करुन हा निर्णय जाहीर केला. अकार्यक्षम नोकरशाही आणि कोविड १९ महामारीदरम्यानचं ढिसाळ व्यवस्थापन यामुळे संघटनेचा मूळ उद्देश मागे पडल्याची टीक...

January 22, 2026 8:11 PM

views 30

दावोसमधे गाझा पट्टीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांतता मंडळाची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दावोसमधे गाझा पट्टीत शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूने शांतता मंडळाची घोषणा केली. यावेळी भारताचे प्रतिनिधी अनुपस्थित होते. ट्रम्प यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शांतता मंडळासाठी निमंत्रण दिलं होतं. फ्रान्स, ब्रिटन, चीन, जर्मनी आणि हमासही शांत...

January 22, 2026 11:41 AM

views 22

नीती आयोगाने सिमेंट, ॲल्युमिनियम आणि एमएसएमई क्षेत्रांमधील हरित संक्रमणावरील अहवाल प्रकाशित केला.

नीति आयोगाने काल दिल्लीत सिमेंट, अल्युमिनियम आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आदी क्षेत्रांसाठी कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनामधील घट यांविषयीच्या आराखड्याचा अहवाल प्रकाशित केला. या दरम्यान नीति आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसेच भारताच्या विकासातील शाश्वत...

January 22, 2026 10:04 AM

views 64

महाराष्ट्रातील सर्व मोठे सौर ऊर्जा प्रकल्प या वर्षाअखेरपर्यंत पूर्णत्वास जातील-मुख्यमंत्र्यांची दावोस बैठकीत घोषणा

महाराष्ट्रातील सर्व मोठे सौर ऊर्जा प्रकल्प या वर्षाअखेरपर्यंत पूर्णत्वास जातील अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. शेतकऱ्यांना स्थिर सौर ऊर्जा पुरवठा करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पांचे आरेखन करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. दावोसमध्ये 19 ते 23 जानेवारी दरम्यान सुरू असल...

January 22, 2026 1:36 PM

views 33

ग्रीनलँडवर नियंत्रणासाठी बळाचा वापर करणार नाही- राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

ग्रीनलँडवर नियंत्रणासाठी बळाचा वापर करणार नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे मात्र आर्क्टिक बेटाची मालकी वॉशिंग्टनकडे द्यावी या मागणीचा त्यांनी पुनरूच्चार केला आहे. दावोसमध्ये आर्थिक मंचाच्या परिषदेला संबोधित करताना ग्रीनलँडच्या अधिग्रहणासंदर्भात चर्चा करण्यासाठी तातडी...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.