मंगोलिया इथे आयोजित ‘उलान बातर २०२५ कुस्ती स्पर्धेत’ भारतीय कुस्तीवीरांनी काल ४ सुवर्णपदकांसह एकूण सहा पदकं पटकावली. पॅरिस २०२४ ऑलिम्पिक पदक विजेती अंतिम पंघालनं ५३ किलो वजनी गटात आपल्या प्रतिस्पर्ध्यावर १०-० अशा मोठ्या फरकानं विजय मिळवला. ५७ किलो वजनी गटात नेहा संगवाननं, बोलोरतुया खुरेलखू या ऑलिम्पिक पदक विजेतीवर ४-० अशी मात करत सुवर्णपदक पटकावलं. तर, मुस्काननं ५९ किलो आणि हर्षितानं ७२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. याव्यतिरिक्त, पुरुषांच्या ग्रीको-रोमन ६० किलो वजनी गटात सुरज यानं रौप्य तर महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाईल गटात निलमनं कांस्य पदक पटकावलं.
Site Admin | May 31, 2025 1:53 PM | Ulaanbaatar 2025 | wrestling
उलान बातर २०२५ कुस्ती स्पर्धेत भारताला ४ सुवर्णपदक
