मिश्र

January 22, 2026 8:29 PM

views 51

झारखंडमध्ये चकमकीत १५ नक्षलवादी ठार

झारखंडच्या सिंघभूम जिल्ह्याच्या सारांदा इथल्या जंगलात आज सकाळी झालेल्या चकमकीत १५ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं. मारलेल्या नक्षलवाद्यांमध्ये त्यांचा प्रमुख नेता पातिराम मंझी उर्फ अनल दा यांचा समावेश असून त्याच्यावर एक कोटी रुपयांचं बक्षिस लावण्यात आलं होतं. प्रत्येकी दोन लाख रुपयांचं बक्षिस असलेल्य...

January 22, 2026 8:27 PM

views 71

जम्मू-काश्मिरमध्ये झालेल्या अपघातात १० जवानांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

जम्मू काश्मीर इथल्या डोडा जिल्ह्यात आज लष्कराचं एक वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात १० सैनिकांचा मृत्यू झाला असून दहा जण गंभीर जखमी आहेत. लष्कराचं एक वाहन भाडेवाह ते चंबा मार्गावर असताना हा अपघात झाला. जखमी जवानांना उधमपूर इथल्या लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्म...

January 18, 2026 2:56 PM

views 51

नासाचं ५० वर्षांहून अधिक कालावधीतील पहिल्या मानवी चंद्र मोहिमेसाठी नवीन चंद्र रॉकेट प्रक्षेपण पॅडवर

‘नासा’, या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने, आपलं नवीन शक्तिशाली चांद्र-यान प्रक्षेपकापर्यंत पोहोचवलं आहे. हे यान अंतराळवीरांना घेऊन चंद्रप्रदक्षिणा करणार आहे. ३२२ फूट लांबीचं एसएलएस, म्हणजेच स्पेस लाँच सिस्टम- रॉकेट काल फ्लोरिडामधल्या केनेडी स्पेस सेंटरमधून लाँच पॅडवर नेण्यात आलं. फेब्रुवारीच्या ...

January 8, 2026 6:47 PM

views 54

शेअर बाजारात घसरण

अमेरिकेकडून पुन्हा अतिरीक्त आयात शुल्क लादले जाईल, या भीतीनं देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार घसरण झाली. दिवसअखेर सेन्सेक्स ७८० अंकांनी घसरुन ८४ हजार १८१ अंकांवर बंद झाला.   निफ्टी २६४ अंकांची घसरण नोंदवून २६ हजारांच्या खाली जाऊन २५ हजार ८७७ अंकांवर स्थिरावला. धातू, तेल आणि नैसर्गिक वायू यासारख...

January 6, 2026 1:30 PM

views 68

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या  निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या  निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निवडणुकी संदर्भात न्यायालयात विविध याचिका दाखल असून त्यावरची सुनावणी होईपर्यंत निवडणूक घेऊ नये असं न्यायालयाने म्हटलं आहे. क्रिकेटपटू केदार जाधव, तसंच सर परशुरामभाऊ महाविद्यालय आणि इतक काही याचिकाकर्त्यांनी विविध म...

January 6, 2026 1:19 PM

views 164

माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन

माजी केंद्रीय मंत्री  सुरेश कलमाडी यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अंतिम संस्कार करणात येणार आहेत.  कलमाडी यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी आज  निधन झालं. काही दिवसांपासून ते आजारी होते. भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून सेवा बजावताना त्यांनी १९६५ आणि १९७१ च्या युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला होता. निवृत्तीनंतर ...

January 6, 2026 10:55 AM

views 2.2K

EPFO च्या वेतन मर्यादेत सुधारणा करण्याबाबत येत्या चार महिन्यांत निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

ईपीएफओच्या गेल्या 11 वर्षांपासून बदल न झालेल्या वेतन मर्यादेत सुधारणा करण्याबाबत येत्या चार महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला दिले आहे. न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या खंडपीटाने हे निर्देश...

January 5, 2026 7:57 PM

views 145

माजी बिलिअर्ड्स जगज्जेते मनोज कोठारी यांचं निधन

माजी बिलिअर्ड्स जगज्जेते मनोज कोठारी यांचं आज तामीळनाडूत तिरुनेलवेली इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. बिलिअर्ड्समधल्या त्यांच्या कारकीर्दीत ते १६ वेळा राज्य विजेते झाले, तर १९९० मधे त्यांनी विश्वविजेतेपद पटकावलं. त्यांच्या या कामगिरीबद्दल २००५ मधे त्यांना ध्यानचंद पुरस्कार...

December 30, 2025 1:39 PM

views 70

मुंबईत भांडुप बेस्ट बसच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू, ९ जण जखमी

मुंबईत भांडुप इथं काल रात्री ‘बेस्ट’ च्या गाडीने धडक देऊन झालेल्या अपघातात चार पादचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले. बस चालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.    भांडुप बस दुर्घटनेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त के...

December 28, 2025 8:09 PM

views 66

८७ व्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत ऋत्विक संजीव एस. यानं पटकावलं पुरुष एकेरीचं जेतेपद

विजयवाडा इथं झालेल्या . त्यानं अंतिम सामन्यात भारत राघव याचा २१-१६, २२-२० अशा थेट गेम्समध्ये पराभव केला. पुरुष दुहेरीत ए. हरिहरन आणि रुबन कुमार या जोडीनं मिथिलेश कृष्णन आणि प्रेजन यांचा २४-२२, २१-१७ असा पराभव करून विजेतेपद पटकावलं.  महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात माजी विजेत्या शिखा गौतम आणि अश्विनी...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.