प्रादेशिक बातम्या

June 4, 2025 7:38 PM June 4, 2025 7:38 PM

views 7

बुलढाणा जिल्ह्यात भरधाव जाणाऱ्या ट्रकमुळे झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली मेहकरदरम्यान भरधाव जाणाऱ्या ट्रकमुळे झालेल्या अपघातात तिघेजण मृत्यूमुखी पडले. वेगात जाणाऱ्या ट्रकने चारचाकीला धडक दिली आणि ती चारचाकी दुचाकीवर आदळली, दुचाकीवरचे दोघे आणि  चारचाकीतली एक अशा एकूण तीन व्यक्ती या अपघातात दगावल्या. जखमींवर उपचार सुरु आहेत.

June 4, 2025 7:33 PM June 4, 2025 7:33 PM

views 10

भारतभेटीवर आलेल्या पॅलासिओस यांनी आज दिली मुंबईला भेट

भारत भेटीनं आपण प्रभावित झाल्याची भावना पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो पेना पॅलासिओस यांनी आज व्यक्त केली. तीन दिवसांच्या भारतभेटीवर आलेल्या पॅलासिओस यांनी आज मुंबईला भेट दिली. यावेळी त्यांचं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी स्वागत केलं.   जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयास आलेल्य...

June 4, 2025 7:24 PM June 4, 2025 7:24 PM

views 17

जपानचे वाणिज्य दूतावास अधिकारी यागी कोजी यांनी अजित पवार यांची घेतली भेट

जपानचे वाणिज्य दूतावास अधिकारी यागी कोजी यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. जपानची भारतात मोठी गुंतवणूक आहे.   रोजगारनिर्मितीबरोबरच राज्याच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक प्रगतीत मोलाचं योगदान देणाऱ्या जपानी कंपन्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यास...

June 4, 2025 7:20 PM June 4, 2025 7:20 PM

views 10

आपत्तीग्रस्तांना ४९ कोटी रुपये निधी वितरीत करण्यात येणार

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी आपत्तीग्रस्तांना ४९ कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यासाठी मान्यता दिल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. या संदर्भातला  शासन निर्णय जारी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. या निर्णयानुसार राज्य आपत्ती निवारण नि...

June 4, 2025 7:13 PM June 4, 2025 7:13 PM

views 7

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न

नैसर्गिक आपत्तीकाळात सामान्य नागरिकांना झळ बसू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अचूक वापर करुन व्यवस्थापन करावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री ...

June 4, 2025 7:09 PM June 4, 2025 7:09 PM

views 10

वनालगतच्या गावांमधे कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित कॅमेरे लावण्याचे वनमंत्र्यांचे निर्देश

राज्यातल्या वनालगतच्या गावांमधे कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित कॅमेरे लावण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी आज दिले. वन्यजीव आणि मनुष्य संघर्ष टळावा यासाठी हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. विदर्भात सातत्याने होणाऱ्या वन्यप्राणी आणि मनुष्य संघर्षाबाबत आज मंत्रालयात बैठक झाली.   जंगलातील प्राणी ...

June 4, 2025 2:45 PM June 4, 2025 2:45 PM

views 2

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ८ कोटी ६० लाख किमतीचा गांजा जप्त

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या दोन दिवसात सीमाशुल्क विभागाने ८ कोटी ६० लाख किमतीचा गांजा जप्त केला. बँकॉकहून दोन वेगवेगळ्या विमानातून आलेल्या प्रवाशांचा संशय आल्याने त्यांची कसून तपासणी केली असता त्यांनी सामानातून सुमारे साडेआठ  किलो गांजा लपवून आणल्याचं उघडकीस आलं. ...

June 4, 2025 1:44 PM June 4, 2025 1:44 PM

views 8

प्रत्येकाला घर देणारं ‘महाराष्ट्र’ देशातलं पहिलं राज्य ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्रात ८० हजार कोटींची गुंतवणूक होणार असून प्रत्येकाला घर देणांर महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते पुणे इथं प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरी...

June 3, 2025 8:18 PM June 3, 2025 8:18 PM

views 65

राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. आयोगासाठी पदनिर्मिती, जागा आणि अनुषांगिक खर्चालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. केंद्रीय स्तरावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्याकरिता दोन स्वतंत्र आयोग ...

June 3, 2025 7:39 PM June 3, 2025 7:39 PM

views 21

राज्यातल्या ३० लाख बेघर जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे मिळवून देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य – मुख्यमंत्री

राज्यातल्या ३० लाख बेघर जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे मिळवून देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण लाभार्थी मेळावा आज पुण्यामध्ये झाला त्यावेळी ते बोलत होते. या घरांसाठी ८० हजार कोटी रुपये खर्चाची त...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.