June 4, 2025 7:20 PM

printer

आपत्तीग्रस्तांना ४९ कोटी रुपये निधी वितरीत करण्यात येणार

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी आपत्तीग्रस्तांना ४९ कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यासाठी मान्यता दिल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. या संदर्भातला  शासन निर्णय जारी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. या निर्णयानुसार राज्य आपत्ती निवारण निधीच्या मानकानुसार कोकण विभागाला ५ कोटी रुपये, पुणे विभागाला १२ कोटी रुपये, नाशिक विभागाला ५ कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगर विभागाला १२ कोटी रुपये, अमरावती विभागाला ५ कोटी रुपये आणि नागपूर विभागाला १० कोटी रुपये असे एकूण ४९ कोटी रुपये इतका निधी  वितरीत करायला  मान्यता देण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.