मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या दोन दिवसात सीमाशुल्क विभागाने ८ कोटी ६० लाख किमतीचा गांजा जप्त केला. बँकॉकहून दोन वेगवेगळ्या विमानातून आलेल्या प्रवाशांचा संशय आल्याने त्यांची कसून तपासणी केली असता त्यांनी सामानातून सुमारे साडेआठ किलो गांजा लपवून आणल्याचं उघडकीस आलं. या प्रकरणी तीन भारतीय नागरिकांना अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली अटक केली आहे.
Site Admin | June 4, 2025 2:45 PM | Mumbai Customs Zone
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ८ कोटी ६० लाख किमतीचा गांजा जप्त
