भारत भेटीनं आपण प्रभावित झाल्याची भावना पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो पेना पॅलासिओस यांनी आज व्यक्त केली. तीन दिवसांच्या भारतभेटीवर आलेल्या पॅलासिओस यांनी आज मुंबईला भेट दिली. यावेळी त्यांचं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी स्वागत केलं.
जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयास आलेल्या भारतानं आगामी काळात जागतिक पटलावर महत्त्वाची भूमिका बजावावी. भारतासोबत कृषी, नवीकरणीय ऊर्जा यांसह विविध क्षेत्रात भागीदारी करण्याची आपली इच्छा असल्याचंही पॅलासिओस यांनी यावेळी व्यक्त केलं.