प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्रात ८० हजार कोटींची गुंतवणूक होणार असून प्रत्येकाला घर देणांर महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते पुणे इथं प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
शिवराजसिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण झालं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्याची घरं पूर्ण करत असताना केंद्राने २० लाख घरकुलांना मंजुरी दिली होती. त्यापैकी १० लाख घरांचा पहिला हप्ता ग्रामविकास विभागाने जमा केला आहे. त्यामुळे एकही लाभार्थी घरापासून वंचित राहणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.