प्रादेशिक बातम्या

April 7, 2025 9:15 AM April 7, 2025 9:15 AM

views 14

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी

मागील दोन दिवसांत बीड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं असून, प्रशासनाने तातडीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्...

April 7, 2025 9:07 AM April 7, 2025 9:07 AM

views 4

राज्यात ८० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन

राज्यात मार्च अखेरच्या ऊस गाळप हंगामाच्या अहवालानुसार, ८० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झालं आहे. एकूण २०० पैकी १८९ कारखान्यांची धुराडी ऊस संपल्यानं बंद झाली असून, सध्या केवळ ११ साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात २७ पूर्णांक ६८ लाख मेट्रिक टन घट झाल्याचं स...

April 6, 2025 8:42 PM April 6, 2025 8:42 PM

views 13

येत्या ३-४ दिवसात महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात कमाल तापमानात

येत्या ३-४ दिवसात महाराष्ट्र, वायव्य भारत, मध्य भारत आणि  दक्षिण द्वीपकल्पात कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.  गुजरात, राजस्थान, हरियाणा चंदीगढ, दिल्ली आणि पंजाबमधे पुढचे चार-पाच दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.    पूर्व भारतात येत्या...

April 6, 2025 7:04 PM April 6, 2025 7:04 PM

views 10

मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशाकडून १२०० ग्रॅम सोनं जप्त

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी एका प्रवाशाकडून १ कोटी २ लाख रूपये किंमतीचं १२०० ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं आहे. जेदाह इथून इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातून आलेल्या या प्रवाशाच्या बँगेची तपासणी केली असता  त्यातून आणलेल्या दोन इलेक्ट्रिक इस्त्र्यांमध्ये २४ कॅरट सोन्...

April 6, 2025 6:22 PM April 6, 2025 6:22 PM

views 15

विधीसंघर्षित मुलांच्या पुनर्वसनासाठी हेल्प डेस्क स्थापन

विधीसंघर्षित मुलांच्या पुनर्वसनासाठी हेल्प डेस्क स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. विधीसंघर्षित मुलांच्या पुनर्वसनासाठी तसंच त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी या डेस्कच्या माध्यमातून कार्य केलं जाईल. गुन्हेगारीत अडकलेली अनेक मुलं गरीब, दुर्बल घटकांतली अस...

April 6, 2025 8:41 PM April 6, 2025 8:41 PM

views 4

देशभरात रामनवमीचा उत्साह

आज प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणजेच रामनवमी देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. अयोध्येतल्या राममंदिरासह देशातल्या विविध ठिकाणच्या राममंदिरांमध्ये दुपारी बारा वाजता रामजन्म सोहळा साजरा झाला. जगाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येत भाविक येत आहेत. देशभरात ठिकठिकाणी भजन, कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आय...

April 6, 2025 3:28 PM April 6, 2025 3:28 PM

views 4

भारतानं अर्थव्यवस्था दुप्पटीनं वाढवली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

गेल्या दहावर्षात भारतानं आपली अर्थव्यवस्था दुपटीनं वाढवली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज तमीळनाडूत रामेश्वरम इथं समुद्रावरच्या उघडता येणाऱ्या पंबन रेल्वे पुलाच्या उद्घाटनासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. गेल्या दह...

April 6, 2025 3:10 PM April 6, 2025 3:10 PM

views 1

रामनवमीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

हिंगोलीत संकटमोचन हनुमान मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. लहान मुलांनी श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांचा देखावा केला होता. नागपुरातही  उत्साहाचं  वातावरण असून  पोद्दारेश्वर राम मंदिरात विविध पूजा अर्चना केल्या जात आहेत. अकोला शहरात राजेश्वर मंदिर परिसरापासून बाईक रॅली काढण्यात आली. शिर्ड...

April 6, 2025 10:48 AM April 6, 2025 10:48 AM

views 17

सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी कणकवलीसह काही भागात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. जोरदार वाऱ्यानं, शहरासह अनेक ठिकाणी झाडं पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.अवकाळी पावसामुळे आंबा, काजू आणि जांभूळ पिकांचं मात्र नुकसान झालं आहे.

April 5, 2025 8:12 PM April 5, 2025 8:12 PM

views 13

राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित-मुख्यमंत्री

राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. या अनुषंगाने महसूल विभागाच्या १०० दिवस कृती कार्यक्रमासंबंधीच्या क्षेत्रीय कार्यशाळेचं कालपासून पुणे इथं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. १०० दिवसांचा कृत...