प्रादेशिक बातम्या

April 8, 2025 3:35 PM April 8, 2025 3:35 PM

views 5

वर्ध्यात झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या ४ जणांचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यात तरोडा इथं झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या ४ जणांचा मृत्यू झाला. मरण पावलेले पोलीस कर्मचारी आणि त्यांचं कुटुंब मांडगाव इथून रामनवमी कार्यक्रमाहून परतत होते. वाटेत आलेल्या जनावराला वाचवण्यासाठी गाडी वळवताना नियंत्रण सुटल्यानं ती दुभाजकाला धडकून हा अपघात झाला.

April 8, 2025 3:36 PM April 8, 2025 3:36 PM

views 13

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशीची प्रकाश आंबेडकरांची मागणी

परभणी इथले आंबेडकरी कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतल्या मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी याचिकाकर्ते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबाद उच्च न्यायालयात केली. याप्रकरणी एसआयटी नेमावी, ती न्यायालयाच्या देखरेखीखाली असावी, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली आहे. सीआयडीलाही ...

April 8, 2025 3:17 PM April 8, 2025 3:17 PM

views 2

मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई

मुंबई विमानतळावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दोन प्रवाशांकडून ९ कोटी ५३ लाख रुपयांचा गांजा आणि ५८ लाख ८३ हजार रुपये किमतीचं सोनं जप्त केलं. याप्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. एक प्रवासी बँकॉकहून इंडिगो एअरलाइन्सच्या विमानानं मुंबईला तर दुसरा इंडिगो एअरलाइन्सच्या विमानानं दुबईहून मुंबईला आला हो...

April 8, 2025 8:50 PM April 8, 2025 8:50 PM

views 11

नवीन वाळू धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

राज्य मंत्रीमंडळानं आज नवीन वाळू धोरणाला मंजुरी दिली. याअंतर्गत घरांच्या बांधकामांसाठी ५ ब्रास वाळू मोफत दिली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नव्या धोरणात डेपो पद्धत बंद करुन वाळू घाटांची निविदा काढली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.     धरणांमधून वाळू उत्खनन करुन त्य...

April 8, 2025 3:47 PM April 8, 2025 3:47 PM

views 12

कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाची सुनावणी

कॉमेडियन कुणाल कामरा याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकार आणि आमदार मूरजी पटेल यांना उत्तर द्यायला सांगितलं. तसंच कुणाल कामराला १६ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी आपल्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द करायची मागणी ...

April 8, 2025 3:46 PM April 8, 2025 3:46 PM

views 7

देशातल्या काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट

भारतीय हवामान विभागाने आज राजस्थान, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात हरयाणा, चंडिगढ, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश, विदर्भ आणि पूर्व मध्य प्रदेशातही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात कमाल ता...

April 8, 2025 3:07 PM April 8, 2025 3:07 PM

views 12

२६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारताकडे सुपूर्द करण्याचा मार्ग मोकळा

२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यापर्णाचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी करणारा त्याचा अर्ज अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला आहे.  तहव्वूर राणा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक असून सध्या तो लॉस एंजेलिस मधे डिटेन्शन से...

April 7, 2025 9:12 PM April 7, 2025 9:12 PM

views 1

बदलापूर चकमक प्रकरणी पाच पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या चकमक प्रकरणी पाच पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेशही उच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायमूर्त...

April 7, 2025 9:00 PM April 7, 2025 9:00 PM

views 17

देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांच्या चमूच्या मुंबई ते सेशेल्स समुद्रप्रवासाला प्रारंभ

देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांच्या १२ महिला अधिकाऱ्यांच्या चमूच्या मुंबई ते सेशेल्स समुद्रप्रवासाला आज प्रारंभ झाला. पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कमांडंट लेफ्टनंट जनरल ए. के. रमेश यांनी IASV त्रिवेणी या नौकेवरच्या या चमूला झेंडा दाखवून सेशेल्सच्या दिशेनं रवाना केलं. भारतीय लष्कर, नौदल...

April 7, 2025 8:22 PM April 7, 2025 8:22 PM

views 8

विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा इशारा

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी काल कमाल तापमानात किंचित वाढ झाली, रात्रीचं तापमान सरासरीइतकंच होतं. येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हवामान उष्ण आणि वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे तर याच कालावधीत विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आह...