प्रादेशिक बातम्या

April 7, 2025 8:17 PM April 7, 2025 8:17 PM

views 16

राज्य सरकारनं मागणी केल्यास शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त मदत दिली जाईल-कृषीमंत्री

राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विमा आणि अन्य योजनांतून केंद्र सरकार पैसा पुरवत आहेच पण आवश्यकतेप्रमाणे राज्य सरकारनं मागणी केल्यास अतिरिक्त मदत दिली जाईल, असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज सांगितलं.  नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्रात कृषी विज्ञान मंडपम आणि मह...

April 7, 2025 7:25 PM April 7, 2025 7:25 PM

views 12

सायबर गुन्हेगारी रोखण्याचं आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज-मुख्यमंत्री

सायबर गुन्हेगारी रोखणं हे सर्वात मोठं आव्हान असून हे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं. मुंबई पोलीस दलाच्या विविध उपक्रमांचं लोकार्पण आज देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आझाद मैदान पोलीस ठाण्यातल्या उत्कर्ष सभागृहात झालं, त्यावेळी ते बोलत ह...

April 7, 2025 7:32 PM April 7, 2025 7:32 PM

views 7

नाशिकच्या काळाराम मंदिराचे अध्यक्ष बदलण्याचे न्यायालयाचे आदेश

नाशिकमधल्या काळाराम मंदिर विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांना काढून टाकून दुसऱ्या अध्यक्षाची नियुक्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. काळाराम मंदिरातल्या पुजाऱ्यांना नैवेद्यासाठी दिली जाणारी रक्कम परत सुरू करण्याची मागणी पुजाऱ्यांनी न्यायालयात केली होती. यासंदर्भात अध्यक्षांनी तडजोडीसाठी बैठक घ...

April 7, 2025 6:48 PM April 7, 2025 6:48 PM

views 10

कच्च्या तेलाचे दर घसरल्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला करुन द्या-हर्षवर्धन सपकाळ

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरल्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला करुन द्या. पेट्रोल-डिझेलवरचे कर कमी करुन पेट्रोल ५१ रुपये आणि डिझेल ४१ रुपये प्रति लिटरने द्या, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत केली.   संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या क...

April 7, 2025 6:33 PM April 7, 2025 6:33 PM

views 14

दिव्यांगांसाठी रोजगार आणि स्टॉलबाबतचं धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाकरता नवनवीन योजना आणि धोरणं आखण्याचे, तसंच त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज संबंधित विभागांना दिले. दिव्यांगांच्या विविध समस्यांबाबत मुंबईत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी राज्यमंत्र...

April 7, 2025 3:56 PM April 7, 2025 3:56 PM

views 10

कॉमेडियन कुणाल कामराच्या विरोधातल्या FIR ला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

कॉमेडियन कुणाल कामराने मुंबई पोलिसांनी त्याच्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआरला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक वक्तव्य केल्याबद्दल कामराविरुद्ध प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे. राज्यघटनेनं दिलेल्या अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्यासह मूलभ...

April 7, 2025 3:29 PM April 7, 2025 3:29 PM

views 17

अहिल्यानगरमधल्या १११ शाळांमधे इंटरॅक्टिव्ह टच पॅनल आणि डिजिटल ई लर्निंग सॉफ्टवेअरचं लोकार्पण

‘डिजिटल स्कूल’ या संकल्पनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या १११ शाळांमधे इंटरॅक्टिव्ह टच पॅनल आणि डिजिटल ई लर्निंग सॉफ्टवेअरचं लोकार्पण आज विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आलं. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच ज...

April 7, 2025 3:11 PM April 7, 2025 3:11 PM

views 8

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकार सायबर प्रयोगशाळांचं जाळं मजबूत करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकार सायबर प्रयोगशाळांचं जाळं अधिकाधिक मजबूत करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईत डी बी मार्ग पोलीस ठाण्यात सायबर प्रयोगशाळेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते. वरळी पोलीस ठाणे आणि गोवंडी पोलीस ठाण्यातल्या प्रयोगशाळां...

April 7, 2025 10:41 AM April 7, 2025 10:41 AM

views 12

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश

राज्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकार्यांना दिले असल्याचं, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं. नंदुरबार तालुक्यातल्या नुकसानग्रस्त ठाणेपाडा शिवारात कांदाशेतीची पाहणी केल्यानंतर ते काल बोलत होते. या पावसामुळे राज्यातले २४...

April 7, 2025 1:27 PM April 7, 2025 1:27 PM

views 11

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आजपासून पोर्तुगाल आणि स्लोव्हाकिया दौरा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगाल आणि स्लोव्हाकियाच्या दौऱ्यावर असून काल त्या पोर्तुगालमध्ये पोहोचल्या आहेत. पोर्तुगाल दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू पोर्तुगालच्या राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सौसा यांची भेट घेऊन शिष्टमंडळस्तरीय चर्चा करतील. पोर्तुगालचे प्रधानमंत्री लुईस मॉन्टेनेग्रो आणि त्यांच्या संस...