खेळ

May 1, 2025 7:23 PM

views 14

चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार प्रदान

चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डी यांना आज युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविय यांनी नवी दिल्ली इथं  २०२३ चा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार दिला. या दोनही खेळाडूंची समर्पण वृत्ती आणि असामान्य कामगिरीचा हा गौरव आहे असं मांडविय यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

April 29, 2025 2:30 PM

views 12

तिरंगी स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर

महिला क्रिकेटमधे श्रीलंकेत सुरु असलेल्या तिरंगी स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ५० षटकांमधे भारताच्या ६ बाद २७६ धावा झाल्या आहेत. प्रतिका रावळच्या ७८ धावा धावा हे भारताच्या डावाचं वैशिष्ट्य. 

April 29, 2025 1:41 PM

views 29

IPL: आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स चा सामना

आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना दिल्लीत रंगणार आहे. सामना संध्याकाळी साडेसातला सुरु होईल.   काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा आठ गडी राखून पराभव केला. गुजरात टायटनच्या २०९ धावांना प्रत्युत्तर देताना राजस्थान रॉयल्सने २५ च...

April 29, 2025 10:49 AM

views 8

IPL: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं सर्वांत कमी वयात वेगवान शतक झळकावत रचला इतिहास

आय पी एल क्रिकेट स्पर्धेत 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी या खेळाडूच्या 38 चेंडूतील 101 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा आठ गडी राखून पराभव केला.   वैभवने आपल्या या तडाखेबंद खेळीत सात चौकार आणि 11 षटकार लगावले. आय पी एल च्या इतिहासात सर्वात कमी वयात वेगवान शतक झळकवणारा खेळाडू म्...

April 29, 2025 10:33 AM

views 14

सुदिरमन करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना इंडोनेशियाशी

चीनमध्ये शियामेन इथं सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ सुदिरमन करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत 'ड' गटातील महत्त्वपूर्ण लढतीत आज भारताचा सामना इंडोनेशियाशी होणार आहे. गेल्या रविवारी डेन्मार्ककडून १-४ असा पराभव पत्करावा लागल्यानं भारतीय संघाची वाटचाल सुरुवातीलाच कठोर झाली आहे.   गटातील अव्वल दोन संघांनाच प...

April 28, 2025 1:01 PM

views 16

IPL: राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज लढत

आयपीएल क्रिकेटमध्ये आज जयपूरमधे राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे.   मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या कालच्या सामन्यात  मुंबई इंडियन्स संघानं लखनौ सुपर जायंट्स संघावर ५४ धावांनी मात केली. मुंबई इंडियन्स संघानं ठेवलेल्या २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर ...

April 27, 2025 8:37 PM

views 25

महिला क्रिकेटमधे भारताचा श्रीलंकेवर ९ गडी राखून विजय

महिला क्रिकेटमधे, भारत, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत, आज श्रीलंकेत कोलंबो इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर ९ गडी राखून विजय मिळवला.     भारतानं नाणेफेक जिंकून यजमान श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं, आणि त्यांचा डाव ३८ षटकं आणि ...

April 27, 2025 1:24 PM

views 13

WTT Contender Tunis 2025 : भारताच्या मानुष शाह आणि दिया चितळे जोडीला मिश्र दुहेरीचं विजेतेपद

ट्युनिशियाची राजधानी ट्यूनिस मध्ये काल झालेल्या जागतिक टेबल टेनिस कंटेंडर स्पर्धेत, भारताच्या मानुष शाह आणि दिया चितळे या जोडीनं मिश्र दुहेरीचं  विजेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत या जोडीनं  जपानच्या सोरा मात्सुशिमा आणि मिवा हरिमोटो या दुसऱ्या मानांकित जोडीवर 3-2 असा विजय मिळवला.

April 26, 2025 1:33 PM

views 30

IPL: आज संध्याकाळी कलकत्ता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स या संघांमध्ये सामना

आयपीएल क्रिकेटमध्ये आज संध्याकाळी कलकत्ता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स या संघांमध्ये कलकत्ता इथल्या इडन गार्डन मैदानावर सामना रंगणार आहे.   चेन्नई इथं काल झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद या संघानं यजमान चेन्नई सुपर किंग्स संघाला ५ गडी राखून पराभूत केलं. चिदंबरम स्टेडिअमवर हा सामना पार पडल...

April 25, 2025 3:00 PM

views 37

चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघादरम्यान आजचा सामना

आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघादरम्यान होणार आहे.चेन्नई इथं संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरु होईल.    बेंगळुरू इथे झालेल्या कालच्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने राजस्थान रॉयल्स संघाचा ११ धावांनी पराभव केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.