खेळ

June 7, 2025 1:35 PM June 7, 2025 1:35 PM

views 7

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आज अरीना साबालेंका आणि कोको गॉफ यांच्यात लढत

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अग्रमानांकित अरीना साबालेंका आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेली कोको गॉफ यांच्यात रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता सामना सुरू होईल.   दरम्यान, पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत काल गतविजेत्या कार्लोस अल्काराजचा प्रतिस्प...

June 6, 2025 8:31 PM June 6, 2025 8:31 PM

views 5

जकार्ता इथं सुरु इंडोनेशिया ओपन सुपर १००० स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी या जोडीचा पराभव

जकार्ता इथं सुरु इंडोनेशिया ओपन सुपर १००० स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी या जोडीचा पराभव झाला आहे. यामुळे भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

June 6, 2025 8:30 PM June 6, 2025 8:30 PM

views 6

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत गतविजेता कार्लोस अल्काराज याचा सामना लॉरेंजो मुसेटी याच्याशी सुरू

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आज गतविजेता कार्लोस अल्काराज याचा सामना लॉरेंजो मुसेटी याच्याशी सुरू आहे. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात अग्रमानांकित यानिक सिनरसमोर सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा मानकरी असलेला नोव्हाक ज्योकोविचचं आव्हान असेल. महिला एकेरीच्या अंतिम फेर...

June 6, 2025 3:45 PM June 6, 2025 3:45 PM

views 6

नॉर्वे बुद्धीबळ स्पर्धेत भारताचा डी. गुकेश विजयी

भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशनं नॉर्वे बुद्धीबळ स्पर्धेत आपला चौथा विजय मिळवला. गुकेशनं क्लासिकल स्पर्धा प्रकाराच्या नवव्या फेरीत चीनच्या खेळाडूचा पराभव केला. या विजयासह गुकेश आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात केवळ आता अर्ध्या गुणाचे अंतर आहे. स्पर्धेत आता शेवटची फेरी बाकी आहे.

June 6, 2025 3:27 PM June 6, 2025 3:27 PM

views 30

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आज रवाना झाला. या दौऱ्यात ५ कसोटी सामने होणार असून ते २०२५-२०२७ च्या आयसीसी जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेचा भाग आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज क्रिकेटपटूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरचा हा भारतीय संघाचा पहिलाच कसोटी दौरा आहे. शुभमन...

June 5, 2025 7:08 PM June 5, 2025 7:08 PM

views 3

इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी उपांत्यपूर्व फेरीत दाखल

इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी प्रकारात आज झालेल्या सामन्यात भारताची चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी ही जोडी उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. त्यांनी डेन्मार्कच्या रासमुस केजर आणि फ्रेडरिक सोगार्ड या जोडीचा १६-२१, २१-१८,२२-२० असा पराभव केला.   दरम्यान, भारताच्या पी.व्...

June 5, 2025 2:51 PM June 5, 2025 2:51 PM

views 43

इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपउपांत्य फेरीत पी.व्ही.सिंधूचा पराभव

इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज झालेल्या उपउपांत्य फेरीत भारताच्या पी.व्ही.सिंधूचा थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगकडून पराभव झाला. पहिल्या फेरीत २२-२० गुणांनी सिंधू आघाडीवर होती, त्यानंतर दुसऱ्या फेरीत २१-१० आणि तिसऱ्या फेरीत २१-१८ अशी आघाडी घेत चोचुवोंगने या फेरीत विजय मिळवला. तसंच आज महिला दु...

June 5, 2025 2:47 PM June 5, 2025 2:47 PM

views 6

महिलांच्या हॉकी आशिया चषक २०२५ स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर

महिलांच्या हॉकी आशिया चषक २०२५ स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. ही स्पर्धा ५ ते १४ सप्टेंबर दरम्यान चीनमधल्या हांगझो शहरात खेळली जाणार आहे. या स्पर्धेत भारताच्या महिला हॉकी संघाचा पहिला सामना ५ सप्टेंबरला थायलंडच्या संघाबरोबर होणार आहे. भारतीय संघाचा समावेश ब गटात करण्यात आला असून जपान, था...

June 4, 2025 8:19 PM June 4, 2025 8:19 PM

views 4

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्काराझ याचा उपांत्य फेरीत प्रवेश

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्काराझ याने अमेरिकेच्या टॉमी पॉल याच्यावर ६-०, ६-१, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. येत्या शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य सामन्यात त्याची गाठ इटलीच्या लोरेन्झो मुसेट्टीशी पडेल. 

June 4, 2025 8:06 PM June 4, 2025 8:06 PM

views 10

चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 6 जणांचा मृत्यू

बेंगळुरु मधल्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पहिला आयपीएल विजय साजरा करण्यासाठी जमलेल्या हजारो चाहत्यांनी विविध गेटमधून घाईघाईनं स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चेंगराचेंगरी झाल...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.