इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी प्रकारात आज झालेल्या सामन्यात भारताची चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी ही जोडी उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. त्यांनी डेन्मार्कच्या रासमुस केजर आणि फ्रेडरिक सोगार्ड या जोडीचा १६-२१, २१-१८,२२-२० असा पराभव केला.
दरम्यान, भारताच्या पी.व्ही. सिंधू हिला थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगकडून २२-२०,१०-२१,१८-२१ असा पराभव पत्करावा लागला. तर महिला दुहेरीत ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा मयू मात्सुमोतो आणि युकी फुकुशिया या जापानी जोडीने १३-२१,२२-२४ असा पराभव केला.