प्रादेशिक बातम्या

October 9, 2025 12:23 PM

views 34

मुंबईत भारत-ब्रिटन यांच्यात द्वीपक्षीय चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टारमर यांच्यात मुंबईत द्वीपक्षीय बैठक होणार आहे. कीर स्टारमर दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून काल ते मुंबईत दाखल झाले. स्टारमर यांच्यासमवेत व्यापार शिष्टमंडळही आलं आहे. उभय देशांचे प्रधानमंत्री व्हिजन 2035 नुसार दोन्ही देशांदरम्यानच्या व्याप...

October 8, 2025 8:06 PM

views 87

बँकेची केवायसी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न – SBIचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी

बँकेची केवायसी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न असल्याचं स्टेट बँकेचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज फिनटेक फेस्टमध्ये शेट्टी बोलत होते. यूपीआय वापरकर्ते आता डेबिट कार्डाशिवाय कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये रोख रक्कम जमा करू शकणार आहेत. तसंच, कर्जाचा हप्ताही भरणं आणि थर्ड पार्टी व्...

October 8, 2025 7:33 PM

views 129

पुणे महापालिकेचा दिवळी बोनस जाहीर!

पुणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, तसंच शिक्षण मंडळाकडील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना यंदाच्या दिवाळीनिमित्त ८ पूर्णांक ३३ शतांश टक्के बोनस जाहीर झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या वेतनाबरोबर बोनस दिला जाणार आहे.  विविध विभागांत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनाही पहि...

October 8, 2025 7:14 PM

views 58

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांची मुंबईत विविध उद्योजकांशी चर्चा

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून आज मुंबईत त्यांनी आणि त्यांच्यासोबतच्या व्यापारी शिष्टमंडळानं आज मुंबईत देशातल्या विविध उद्योजकांची भेट घेतली.   भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करार हा युरोपियन महासंघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनने स्वाक्षरी केलेला सर्व...

October 8, 2025 7:02 PM

views 45

ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या वसतीगृहासाठी जमीन अधिग्रहित करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश

ओबीसी समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, कार्यालय आणि अभ्यासिका उभारण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करून जागा निश्चित करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. यासंदर्भात आज मंत्रालयात बावनकुळे यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत अनेक जि...

October 8, 2025 7:29 PM

views 156

नवी मुंबई विमानतळ, मेट्रो ३ चा अखेरचा टप्पा, आणि मुंबई १ ॲपचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

लोकांचं आयुष्य सुकर करण्यासाठी सरकार पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई मेट्रो ३ चा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड दरम्यानचा अखेरचा टप्पा, तिकिट काढण्यासाठीचं मुंबई वन हे ॲप आणि आयटीआयमधल्या अल्प...

October 8, 2025 7:30 PM

views 115

पूरग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ!

पूरग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे, यासोबतच शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते आज मंत्रालयात पूरग्रस्त भागातल्या वि...

October 8, 2025 6:48 PM

views 41

नवी मुंबई विमानतळामुळे राज्याच्या जीडीपीत १ टक्के वाढ होईल, मुख्यमंत्र्यांना विश्वास

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालं. नवी मुंबई विमानतळामुळे राज्याच्या जीडीपीत १ टक्के वाढ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.हा विमानतळ देश आणि राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावेल, असं मुख्यमंत्री देवें...

October 8, 2025 3:01 PM

views 365

शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भातली १२ नोव्हेंबरला सुनावणी

शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर आता येत्या १२ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत होणार असून त्यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी घ्यावी, अशी विनंती ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठा...

October 8, 2025 1:38 PM

views 65

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचं मुंबईत आगमन

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचं आज मुंबईत आगमन झालं. ते  आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टार्मर यांचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केलं. यावेळी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, राजशिष्ट...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.