प्रादेशिक बातम्या

September 20, 2025 8:24 PM September 20, 2025 8:24 PM

views 23

बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २ वर्षात सुरू होणार असल्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा

महत्त्वाकांक्षी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचा सूरत ते बिलमोरा हा पहिला टप्पा २०२७ मध्ये सुरू होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली. या बुलेट ट्रेन मार्गावरच्या घणसोली ते शीळफाटा यादरम्यानच्या बोगद्याचं जोडकाम वैष्णव यांच्या उपस्थितीत आज पूर्ण झालं, त्यावेळी ते वार्ताहरांशी बोलत ह...

September 20, 2025 3:38 PM September 20, 2025 3:38 PM

views 15

जागतिक किनारा स्वच्छता दिनानिमित्त मुंबईत स्वच्छता मोहीम

आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिन आणि सेवा पर्व २०२५ च्या निमित्ताने खासदार रविंद्र वायकर यांच्या उपस्थितीत मुंबईत जुहू आणि वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. जुहू चौपाटीवरच्या महात्मा गांधीच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन स्वच्छता मोहिमेची सुरुवात झाली. मोहिमेच्या वेळी उपस्थितांना स्व...

September 20, 2025 3:31 PM September 20, 2025 3:31 PM

views 27

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या दहाव्या अखिल भारतीय परिषदेचं सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या दहाव्या अखिल भारतीय परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत झालं. शासकीय अधिकाऱ्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी न्यायाधीकरण महत्त्वाचं असल्याचं न्यायमूर्ती गवई यावेळी म्हणाले. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीक...

September 20, 2025 3:22 PM September 20, 2025 3:22 PM

views 41

जागतिक किनारा स्वच्छता दिनानिमित्त रत्नागिरीत स्वच्छता मोहीम

जागतिक किनारा स्वच्छता दिन आणि सेवा पर्व २०२५ या उपक्रमांतर्गत आज सकाळी रत्नागिरी तालुक्यातल्या भाट्ये समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. जिल्हा प्रशासन, विविध शाळांचे विद्यार्थी आणि विविध कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.   प्लास्टिक पिशव्या टाळण्याचा संदेश देणाऱ्या क...

September 20, 2025 11:30 AM September 20, 2025 11:30 AM

views 52

कमी झालेल्या जीएसटीचा लाभ थेट शेतकऱ्यांना द्या – कृषी मंत्र्यांचे निर्देश

ट्रॅक्टर आणि शेतीसाठीच्या इतर साधनांवरच्या कमी केलेल्या जीएसटीचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे अशा सूचना केंद्रिय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिल्या.   शेतीच्या अवजारांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत काल नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. दरकपातीचा फाय...

September 20, 2025 11:25 AM September 20, 2025 11:25 AM

views 8

भारताची जागतिक टपाल संघटनेच्या परिषदेत पुन्हा निवड

दुबई इथं झालेल्या 28 व्या जागतिक टपाल परिषदेदरम्यान भारताची जागतिक टपाल संघटनेच्या प्रशासन परिषदेत पुन्हा निवड झाली आहे. भारताची पुनर्निवड आंतरराष्ट्रीय समुदायाचा इंडिया पोस्टच्या नेतृत्वावर, सुधारणांवर आणि नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रमांवर असलेला विश्वास दर्शवणारी असल्याचं. दळणवळण मंत्रालयाने एका निवे...

September 20, 2025 10:52 AM September 20, 2025 10:52 AM

views 61

 मतदार यादीतून मतदारांची नावं परस्पर काढून टाकली जाऊ शकत नाही – निवडणूक आयोग

ऑनलाईन किंवा कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाकडून मतदार यादीतून मतदारांची नावं परस्पर काढून टाकली जाऊ शकत नसल्याचा केंद्रीय निवडणूक आयोगानं पुनरुच्चार केला आहे. कर्नाटकातल्या आळंद मतदारसंघात कुठल्याही मतदाराची नावं चुकीच्या पद्धतीनं काढू टाकली गेलेली नसल्याचंही आयोगानं म्हटलं आहे. मतदारांची नावं संशयास...

September 19, 2025 8:35 PM September 19, 2025 8:35 PM

views 20

चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा विधानसभा मतदारसंघात बनावट मतदार नोंदणीचे प्रयत्न रोखले

चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा विधानसभा मतदारसंघात बनावट मतदार नोंदणीचे प्रयत्न निवडणूक अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे रोखल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं पत्रकाद्वारे दिली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे.   &nbsp...

September 19, 2025 7:52 PM September 19, 2025 7:52 PM

views 11

मुंबईत सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पाचं ५० टक्के काम पूर्ण

मुंबई महानगरपालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या खड्डेमुक्त मुंबई उपक्रमाला गती मिळाली असून आतापर्यंत शहरात आतापर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पाचं ५० टक्के काम पूर्ण झालं आहे. उर्वरित कामं  ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात पूर्ण करण्याचे तसंच स्थानिक नागरिकांची मागणी आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्याशिवाय...

September 19, 2025 7:33 PM September 19, 2025 7:33 PM

views 28

दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी होणार

राज्यातल्या जिल्हा परिषदेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे. या प्रमाणपत्रांच्या तपासणीनंतरच लाक्षणिक दिव्यांगत्व असलेल्यांनाच शासनमान्य लाभ देण्यात येणार आहेत. तपासणीत बनावट आणि नियमबाह्य प्रमाणपत्र घेतलेल्यांना किंवा ...