प्रादेशिक बातम्या

September 21, 2025 7:28 PM September 21, 2025 7:28 PM

views 20

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ६८९ कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर

नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई म्हणून राज्य सरकारनं ६८९ कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर केला आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज ही घोषणा केली. जून ते ऑगस्ट २०२५ या काळात अतिवृष्टीनं बाधित या चार जिल्ह्यांमध्ये सरकारी य...

September 21, 2025 7:29 PM September 21, 2025 7:29 PM

views 9

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार – मंत्री पंकजा मुंडे

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असल्याचं मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. अतिवृष्टी झाल्यामुळे जसं नुकसान झालं आहे तसं जिथं पाऊस कमी पडला आहे तिथंही पिकांचं नुकसान झालं आहे, त्याचेही पंचनामे केले जातील असं मुंडे म्हणाल्या. नदीपात्रात अतिक्रमण केल्...

September 21, 2025 6:50 PM September 21, 2025 6:50 PM

views 33

राज्यात ‘नमो युवा रन फॉर नशा मुक्त भारत’ कार्यक्रमाचा प्रारंभ

कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीनं  देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो. त्यामुळे राज्यात पोलीस व्यवस्थेच्या सुधारणांवर भर देण्यात आला असून सायबर सुरक्षेबरोबरच अमली पदार्थ संदर्भातल्या गुन्ह्यांप्रकरणी  राज्य शासनानं ‘झिरो टॉलरन्स धोरण’ अवलंबलं असल्याचं  प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस ...

September 21, 2025 6:51 PM September 21, 2025 6:51 PM

views 11

शारदीय नवरात्रौत्सवाला उद्यापासून प्रारंभ

शारदीय नवरात्रौत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत असून राज्यातल्या देवीच्या साडेतीन शक्तीपीठांसह सर्वच देवी मंदिरांमधे उत्सवाची तयारी उत्साहाने होत आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्रौत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून मंडपांमधे माता महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती विराजमान होत आहेत. तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर क...

September 21, 2025 4:10 PM September 21, 2025 4:10 PM

views 11

सेवा पर्वाअंतर्गत ‘नमो युवा रन’ उपक्रमाचं देशभरात आयोजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त सुरु करण्यात आलेल्या ‘सेवा पर्वा’ अंतर्गत  ‘नमो युवा रन’ हा  उपक्रम देशभरात  विविध ठिकाणी राबवला जात आहे. या उपक्रमामध्ये युवक-युवती मोठ्या संख्येनं  सहभागी होत आहेत. ‘अमली पदार्थ मुक्त देशाच्या निर्मितीच्या सामूहिक  मोहिमेमध्ये देशातल्या युवक...

September 21, 2025 12:47 PM September 21, 2025 12:47 PM

views 13

मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात वृक्षलागवड उपक्रमाला उत्तम प्रतिसाद

मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या वृक्षलागवड उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत तब्बल ५ लाख ५१ हजारांवर रोपे लावण्यात आली आहेत. यावर्षी जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील ११५८ ग्रामपंचायतींना लक्ष्य देण्यात आले होते. यंदा ७ लाख ४९ हजार वृक्षलागवडीच उद्दिष्ट ठेवण्य...

September 21, 2025 11:36 AM September 21, 2025 11:36 AM

views 11

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदी नमिता कीर यांची तर कार्याध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ यांची निवड

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदी नमिता कीर यांची आणि कार्याध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ यांची निवड झाली आहे. परिषदेची केंद्रीय वार्षिक सर्वसाधारण सभा काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं झाली. या सभेत पुढील तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. मंत्री...

September 21, 2025 9:23 AM September 21, 2025 9:23 AM

views 20

सातारा, सांगली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातल्या अतीवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईला मंजुरी

सातारा, सांगली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान अतीवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकंदर ६८९ कोटी रुपयांपेक्षा अधिक भरपाई देण्याला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी केल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

September 21, 2025 9:15 AM September 21, 2025 9:15 AM

views 30

कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो – मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीतून देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. इंडियन पोलीस फाऊंडेशनच्या १०व्या स्थापना दिनानिमित्त काल मुंबईत भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दलाची पुनर्कल्पना या विषयावरील चर्चासत्रात मुख्यमंत्री बोलत होते.

September 21, 2025 9:04 AM September 21, 2025 9:04 AM

views 8

शारदीय नवरात्रोत्सवासाठी राज्यातली शक्तीपीठं सज्ज

नवरात्र महोत्सवासाठी राज्यातील शक्तीपीठांची मंदिरं सज्ज झाली आहेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभतेनं दर्शन घेता यावं यासाठीची सर्व व्यवस्था देवस्थान समिती आणि महापालिकेनं केली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल मंदिर परिसराला भेट...