प्रादेशिक बातम्या

February 5, 2025 4:16 PM

views 22

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक येत्या शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे. शुक्रवारी सकाळी मल्होत्रा व्याजदरांबाबतचे समितीचे निर्णय जाहीर करतील. फेब्रुवारी २०२३ पासून रिझर्व्ह बँ...

February 5, 2025 1:57 PM

views 20

दिवंगत लेखक चमन अरोरा यांच्या ‘एक होर अश्वत्थामा’ या पुस्तकाची २०२४ च्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड

दिवंगत लेखक चमन अरोरा यांच्या ‘एक होर अश्वत्थामा’ या डोगरी भाषेतल्या लघुकथांच्या पुस्तकाची २०२४ च्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची घोषणा काल संस्कृती मंत्रालयानं केली. या पुस्तकाची निवड तीन सदस्यांच्या समितीने एकमताने केली आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे. ताम्रपट आणि १ लाख रुपये अ...

February 5, 2025 11:11 AM

views 24

राज्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहणार असून उद्यापर्यंत हवामान कोरडं राहण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे.  

February 5, 2025 11:08 AM

views 31

पुण्यात 13 फेब्रुवारीपासून रंगणार तेवीसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

तेवीसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 अर्थात पिफ-13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पुण्यात होणार आहे. महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते 13 तारखेला होणार असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. 'शो मॅन-राज कपूर' ही...

February 5, 2025 11:03 AM

views 37

टेमघर प्रकल्पाच्या मजबुतीकरणाच्या कामांसाठी 315 कोटी रूपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता

पुणे जिल्ह्यातल्या टेमघर प्रकल्पाची गळती रोखण्यासाठी आणि त्याचं मजबुतीकरण करण्याच्या कामांसाठी 315 कोटी 5 लाख रूपयांच्या खर्चाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. टेमघ...

February 5, 2025 10:56 AM

views 30

लातूर जिल्ह्यात २० फेब्रुवारी पर्यंत पंचसूत्री विशेष पंधरवड्याचं आयोजन

लातूर जिल्ह्यात २० फेब्रुवारी पर्यंत पंचसूत्री विशेष पंधरवडा राबवला जाणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत.

February 5, 2025 10:54 AM

views 28

ट्रक आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू

जालना-राजूर रस्त्यावर बावणेपांगरी फाट्याजवळ मध्यरात्री भरधाव ट्रक आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

February 5, 2025 10:51 AM

views 37

बीड : ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेतल्या ठेवीदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

बीड जिल्ह्यात काल ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेतल्या ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. ठेवीदारांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जावेत, तसंच ठेवीदाराच्या ठेवी लवकरात लवकर परत द्याव्यात, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं ठेवीदार कृती समितीचे प्रमुख संदीप उबाळे यांनी सांगितलं.

February 5, 2025 10:48 AM

views 42

राज्य शासनाकडून विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य शासनानं काल विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नवी मुंबईतले सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची, नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली असून, नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची, छत्रपती संभाजीनगर इथं वस्तू आणि सेवा कर विभागाचे सहायुक्त म्हणून बदली करण्यात आल...

February 5, 2025 10:44 AM

views 46

शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल काल परिषदेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवारांनी दहा दिवसांच्या आत गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायांकीत प्रतीसाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करावा, असं आवाहन प...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.