प्रादेशिक बातम्या

February 4, 2025 4:02 PM

views 29

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात झाली ‘डिस्ट्रिक्ट इन्स्पायर कॅम्प’ला सुरुवात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात आज ‘डिस्ट्रिक्ट इन्स्पायर कॅम्प’ला सुरुवात झाली. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने घेतलेल्या या ५ दिवसांच्या निवासी शिबीराचं उदघाटन सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते वडाच्या रोपट्याला जलदान करून झालं...

February 4, 2025 3:52 PM

views 21

अमेरिकेचे महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली सदिच्छा भेट

अमेरिकेचे महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रात उद्योग उभारण्यासाठी अनेक अमेरिकन कंपन्या उत्सुक असल्याचे हँकी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.राज्यात ऊर्जा, नव तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, नवनवीन क्षेत्रामधील सहयोगाबद्दल तसंच ऊर्जा क्षेत्रा...

February 4, 2025 3:49 PM

views 22

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना कोणताही अडथळा न येता सुरूच राहील – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत कोणताही अडथळा न येता सुरूच राहील, याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ठाण्यात काल झालेल्या एका मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. लाडकी बहिण योजना बंद करायला महायुती सरकारचा कोणताह...

February 4, 2025 10:13 AM

views 22

राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत काहीशी वाढ

राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत काहीशी वाढ झाली आहे. येत्या 24 तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.  

February 4, 2025 10:11 AM

views 68

राज्यात एक लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त केले जाणार

राज्यभरात प्रत्येक पाचशे मतदारांमागे कार्यकारी अधिकारी याप्रमाणे एक लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त केले जाणार असल्याची माहिती, राज्य निवड समितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती संदर्भातला सुधारित शासन निर्णय काल जारी करण्यात आला....

February 4, 2025 10:05 AM

views 14

महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी- आदिती तटकरे

महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी, असे निर्देश, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. त्या काल याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमत्त महामंडळाअंतर्गत असले...

February 4, 2025 10:01 AM

views 24

लातूर : दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

इयत्ता बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारीपासून तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. लातूर जिल्ह्यात या दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा काल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आढावा घेतला. या ...

February 4, 2025 9:08 AM

views 30

राज्यात आत्तापर्यंत जीबीएस आजाराचे 163 संशयित रुग्ण, 5 संशयित रुग्णांचा मृत्यू

राज्यात आत्तापर्यंत जीबीएस आजाराचे 163 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 127 रुग्णांना जीबीएस आजार झाल्याचं तपासातून निश्चित झालं आहे. 5 संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल 5 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. हा आजार वाढण्याची कारणे शोधण्यासाठी पशूसंवर्धन विभागाच्या वतीने संशोधन करण्यात येणार असल्याच...

February 3, 2025 9:02 PM

views 19

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र १५ सुवर्णासह तिसऱ्या स्थानावर

३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज सातव्या दिवशी विविध संघांनी आपल्या खेळाचं शानदार प्रदर्शन केलं. सेना दल संघानं २२ तर कर्नाटकानं १९ सुवर्ण पदकं मिळवली आहेत. तर महाराष्ट्र १५ सुवर्णासह तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र २६ रौप्य आणि २० कांस्य पदकं जिंकून महाराष्ट्रानं सर्वाधिक ६१ पदकं जिंकली आहेत.  &nbs...

February 3, 2025 9:03 PM

views 31

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी सुमारे २३८०० कोटी रुपयांची तरतूद

केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यात रेल्वेसाठी एकंदर २३ हजार ७७८ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. राज्यात एकंदर १ लाख ७० हजार कोटी रुपयांचं काम सुरू असल्याचंही त्यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि भा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.