प्रादेशिक बातम्या

March 19, 2025 7:50 PM March 19, 2025 7:50 PM

views 29

इतिहाससंशोधक, प्रा. मा. म. देशमुख यांचं निधन

इतिहाससंशोधक, प्रा. मा. म. देशमुख यांचं आज नागपूर इथं निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. इतिहासाचं धाडसी पुनरावलोकन करत त्यांनी शिवकाळातले अनेक महत्त्वाचे मुद्दे समाजासमोर मांडले. "मध्ययुगीन भारताचा इतिहास" हा त्यांचा ग्रंथ विशेष गाजला. शिवराज्य, शिवशाही, प्राचीन भारताचा इतिहास, बहुजन समाज आणि परिवर्तन...

March 19, 2025 7:48 PM March 19, 2025 7:48 PM

views 13

परभणी जिल्ह्यात १० लाख रूपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील ४ आरोपी अटक

परभणी जिल्ह्यात दैठणा इथं १० लाख रूपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतल्या ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ लाख रूपयांचा मुददेमाल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाने पत्रकाव्दारे दिली आहे.   घराचं बांधकाम करताना सापडलेलं सोनं स्वस्तात विकत देऊ असं सांगून ही फसवणूक करण्यात ...

March 19, 2025 7:43 PM March 19, 2025 7:43 PM

views 9

पुण्याच्या टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत 4 जणांचा मृत्यू

पुण्याच्या हिंजवडी भागात टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर पाचजण जखमी झाले. आज सकाळी आठच्या सुमाराला चालकाच्या पायाखाली आग लागली. चालकाने गाडीचा वेग कमी केल्यावर त्याच्यासह पुढे बसलेले कर्मचारी गाडीतून खाली उतरले.   मात्र, दुसऱ्या बाजूचं दार न उघडल्याने इतरांन...

March 19, 2025 7:41 PM March 19, 2025 7:41 PM

views 9

रंगपंचमीचा सण राज्यात उत्साहाने साजरा

रंगपंचमीचा सण आज राज्यात उत्साहाने साजरा झाला. ठिकठिकाणी मंदिरांमधे देवमूर्तींना रंग लावण्यात आला, तर जागोजाग तरुणाईने रंग खेळण्याचा आनंद लुटला. नाशिकच्या पारंपरिक रंगोत्सवासाठी शहरात सात ठिकाणच्या पेशवेकालीन रहाडी म्हणजेच हौद खुले करण्यात आले. शहराच्या मध्य भागातल्या राहाडीमध्ये उत्सव साजरा झाला. प...

March 19, 2025 7:39 PM March 19, 2025 7:39 PM

views 12

राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ नागपूर इथं उभारलं जाणार

राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ नागपूर इथं उभारलं जाणार आहे. याबाबतची अधिसूचना काल प्रकाशित झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या निर्णयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.   महाराष्ट्रानं याआधीच न्यायवैद्यक विज्ञान शास्त्रात आघा...

March 19, 2025 7:34 PM March 19, 2025 7:34 PM

views 3

बाधित शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत नुकसान भरपाई देणार- कृषिमंत्री

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत नुकसान भरपाई देणार, असं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देताना सांगितलं. राजेश विटेकरांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या चर्चेत राहुल पाटील आणि सई डहाके यांनीही सहभाग घेतला. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस आणि पूर प...

March 19, 2025 7:31 PM March 19, 2025 7:31 PM

views 9

औरंगजेब कबर प्रकरणी फहीम खान यांना अटक

औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर सोमवारी नागपूर पोलिस ठाण्याबाहेर निदर्शनं केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते फहीम खान यांना अटक केल्याचं वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. दंगल भडकवण्यात खान यांची काही भूमि...

March 19, 2025 7:24 PM March 19, 2025 7:24 PM

views 6

नागपूर हिंसाचाराप्रकरणी ५१ जणांना २१ तारखेपर्यंत कोठडी

नागपूर हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या ५१ जणांना पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजार केलं असता न्यायालयानं सर्व आरोपींना येत्या २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले.   हिंसाचारात गंभीर जखमी झालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे....

March 19, 2025 7:14 PM March 19, 2025 7:14 PM

views 6

औषधांच्या तुटवड्याची माहिती घेण्यासाठी समिती नेमण्याचे निर्देश

राज्यातल्या सर्व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांमध्ये  औषधांचा तुटवडा नेमका किती आहे याची माहिती घेण्यासाठी तीन आमदारांची समिती नेमण्याचे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिले. पुढच्या  पंधरा दिवसांत त्याचा अहवाल सादर करण्यात यावा असंही त्यांनी सांगितलं.    अंबरनाथ, बदलाप...

March 19, 2025 6:41 PM March 19, 2025 6:41 PM

views 17

उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव मंजूर

उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव आज विधानपरिषदेत आवाजी मतदानानं मंजूर झाला. यावर बोलू देण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. सभापतींनी ती फेटाळून लावली. विरोधी पक्षांनी आपली मागणी लावून धरल्यानं सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे सभापतींनी कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब...