प्रादेशिक बातम्या

March 20, 2025 3:01 PM March 20, 2025 3:01 PM

views 7

साताऱ्यात पारंपरिक बगाड यात्रेचा उत्साह

सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातल्या बावधन मध्ये काल पारंपरिक बगाड यात्रा पार पडली. भैरवनाथाच्या जयघोषात हजारो भाविकांनी गुलाल उधळत बगाड रथ यात्रेत भाग घेतला. या यात्रेसाठी राज्यभरातून अनेक भाविक आले होते. दर वर्षी रंगपंचमीच्या दिवशी ही बगाड यात्रा होत असते. यावेळे भैरवनाथाला अनेक नवस बोलले जातात. ...

March 20, 2025 2:57 PM March 20, 2025 2:57 PM

views 2

दंगलग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी समिती गठीत

नागपूरमध्ये गेल्या सोमवारी रात्री झालेल्या हिंसक घटनेच्या पार्श्वभूमीवर, दंगलग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक समिती गठीत केली आहे. ही समिती दंगलग्रस्त भागात जाऊन परिस्थितीची पाहणी करेल आणि नागरिकांशी संवाद साधेल. या समितीमध...

March 20, 2025 2:27 PM March 20, 2025 2:27 PM

views 6

नागपूर हिंसाचारप्रकरणी ६९ जणांवर गुन्हे दाखल

नागपुरमधे सोमवारी झालेल्या हिंसाचारात सहभागी असलेल्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी १८ विशेष पथकं तयार केली असून  आतापर्यंत  ६९ जणांवर गुन्हे दाखल केल्याचं नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांनी सांगितलं आहे. ते काल  वार्ताहरांशी बोलत होते.    दंगलींच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही चित्रफिती तप...

March 20, 2025 3:36 PM March 20, 2025 3:36 PM

views 5

सभापती आणि अध्यक्षांच्या पक्षपाती कामकाजाबाबत विरोधीपक्षाची राज्यपालांकडे तक्रार

महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषदेत सभापती आणि अध्यक्षांकडून कामकाजात एकांगी आणि पक्षपाती भूमिकेचा अवलंब केला जात आहे, अशी तक्रार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पत्राद्वारे केली आहे.   संसदीय प्रणालीमध्ये विरोधी पक्ष हा एक महत्त्वाचा घटक आहे...

March 20, 2025 2:33 PM March 20, 2025 2:33 PM

views 6

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीच्या मुद्द्यावरून आज महाराष्ट्र विधानसभेत गदारोळ होऊन कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब झालं. दिशाच्या मृत्यूच्या एसआयटी चौकशीचा अहवाल त्वरित सादर करावा आणि सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे आरोप तिच्या वडिलांनी काल केले होते. त्यातल्या आरोपींची चौकशी करावी, गरज...

March 20, 2025 9:42 AM March 20, 2025 9:42 AM

views 12

लातूर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचं आवाहन

२०२४ च्या खरीप हंगामात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानापोटी शासनाकडून मिळणारी मदत प्राप्त करून घेण्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या शेतक-यांनी ई-केवायसी प्रक्रिया येत्या पंचवीस तारखेपर्यंत करून घ्यावी, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या २४ हजार ३८२ शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी...

March 19, 2025 8:12 PM March 19, 2025 8:12 PM

views 6

जवाहरलाल नेहरु बंदरापासून चौकपर्यंतच्या ६ पदरी ग्रीन फील्ड महामार्ग प्रकल्पाला मान्यता

जवाहरलाल नेहरु बंदरापासून चौकपर्यंत ६ पदरी ग्रीन फील्ड महामार्ग बांधणी प्रकल्पाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. या बैठकीनंतर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या प्रकल्पावर साडेचारहजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पीएम गतीशक्ती र...

March 19, 2025 8:10 PM March 19, 2025 8:10 PM

views 5

गुन्ह्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशात ८ व्या स्थानी

राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात अनेक आव्हानं आहेत. पण त्यासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत केलं. अर्थसंकल्पातल्या गृह विभागाच्या अनुदानावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते.   नागपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना अजिब...

March 19, 2025 7:54 PM March 19, 2025 7:54 PM

views 20

सांगली जिल्ह्यात एकूण ५३८ लाभार्थ्यांच्या प्रक्रिया उद्योगांना मंजुरी

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत वैयक्तिक घटकांमध्ये २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सांगली जिल्ह्यात एकूण ५३८ लाभार्थ्यांच्या प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली आहे.   सध्या सांगली जिल्हा ही योजना राबवण्यात देशात द्वितीय स्थानी आणि राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. प्रधानमंत्री ...

March 19, 2025 7:52 PM March 19, 2025 7:52 PM

views 21

येत्या दोन दिवसात मराठवाड्यात पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसांत विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत काल किंचित वाढ झाली.   मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी रात्रीच्या तापमानात उल्लेखनीय वा...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.