प्रादेशिक बातम्या

March 21, 2025 8:11 PM March 21, 2025 8:11 PM

views 4

देवगड हापुस आंब्यावर लागणार आयडी कोड !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड हापुस आंब्याच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी या वर्षीपासून या आंब्यावर यूनिक आयडी कोड लावण्यात येणार आहे. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने हा निर्णय घेतला आहे.   या नवीन पद्धतीनुसार, अस्सल हापुस आंब्यावर हा स्टिकर लावणं बंधनकारक होणार आहे....

March 21, 2025 7:48 PM March 21, 2025 7:48 PM

views 1

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ५५७ अंकांची वाढ

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज ५५७ अंकांची वाढ झाली, आणि तो ७६ हजार ९०६ अंकांवर बंद झाला.   राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १६० अंकांची वाढ नोंदवत २३ हजार ३५० अंकांवर बंद झाला.

March 21, 2025 7:47 PM March 21, 2025 7:47 PM

views 10

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केलेली महिला अटक

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केलेल्या महिलेला सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं खंडणीच्या आरोपावरुन अटक केली आहे. ३ कोटी रुपये दिले नाहीत तर जयकुमार गोरे यांच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्याची धमकी तिने दिली होती.   सदर महिला तिच्या वकीलामार्फत 2 टप्प्य...

March 21, 2025 7:45 PM March 21, 2025 7:45 PM

views 7

आगामी काळात महसुली विभागाच्या सर्व सेवा ऑनलाइन उपलब्ध होतील- महसूल मंत्री

राज्यभरातल्या महसुलाशी संबंधित सुनावण्या डिजिटल स्वरूपात करण्यासाठीच्या प्रत्यय या प्रणालीचा प्रारंभ आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाला.   ‘प्रत्यय’, अर्थात पेपरलेस रिव्हिजन अँड अपील्स इन अ ट्रान्सपरंट वे या प्रणालीमुळे फेरफार, तक्रारी, अपील, पुनर्विलोकन अर्ज इत्यादी विषय ऑनल...

March 21, 2025 7:39 PM March 21, 2025 7:39 PM

views 3

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व बँकांचं नेहमीच सहकार्य- मुख्यमंत्री

राज्य सरकारचं काम बँकांसाठी आश्वासक ठरत असून पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व बँकांनी नेहमीच सहकार्य केल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं.   महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची आढावा बैठक फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. सर्व बँकांकडून या महामं...

March 21, 2025 7:23 PM March 21, 2025 7:23 PM

views 4

आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यासाठीची जबाबदारी आता पर्यटन विभागाकडे

आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी कार्यान्वयन आणि निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी झाला.   स्मारकाच्या उभारणीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली इतिहासतज्ञांसह इतर जाणकारांची समिती स्थापन केली जाणार आहे. या प्रकल्पा...

March 21, 2025 7:18 PM March 21, 2025 7:18 PM

views 8

नंदुरबार जिल्ह्यात आमला वनक्षेत्रात लागलेल्या आगीत १० ते १२ हेक्टर जंगल नष्ट

नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यात आमला वनक्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मधूनच वणवे पेटल्यामुळे आग भडकत आहे. या आगीत आत्तापर्यंत दहा ते बारा हेक्टर जंगल नष्ट झाल्याचं वनविभागानं सांगितलं. वनसंपत्तीचं नुकसान झालं असलं तरी अद्याप जीवितहानीचं वृत्त नाही.

March 21, 2025 7:05 PM March 21, 2025 7:05 PM

views 34

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचं स्पष्ट

परभणी इथं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचं दंडाधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानं दिली. या प्रकरणातल्या विविध तक्रारींची सुनावणी काल आयोगासमोर झाली आणि आयोगानं मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, गुन्हे अन्व...

March 21, 2025 7:01 PM March 21, 2025 7:01 PM

views 13

राज्य सरकार दाओसमध्ये झालेल्या करारांची चोख अंमलबजावणी करेल- उद्योगमंत्री

दाओसमध्ये झालेल्या करारांमुळे राज्यात १६ लाख रोजगार निर्मिती होणार असून, त्यादृष्टीनं राज्य सरकार या करारांची चोख अंमलबजावणी करेल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या करारांच्या अंमलबजावणीबाबत विरोधकांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले.   रा...

March 21, 2025 6:58 PM March 21, 2025 6:58 PM

views 35

देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी समिती गठीत

राज्यातल्या देवस्थान इनाम जमिनी, कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी समिती नेमल्याची महसूल मंत्र्यांकडून विधानसभेत माहिती राज्यातल्या देवस्थान इनाम जमिनी, कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बाव...