प्रादेशिक बातम्या

March 22, 2025 6:51 PM March 22, 2025 6:51 PM

views 11

दिशा सॅलियन हिच्या मृत्यशी संबंधित याचिकेची सुनावणी येत्या २ एप्रिलला होणार

दिशा सॅलियन हिच्या मृत्यशी संबंधित घटनेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे तसंच इतरांच्या विरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी येत्या २ एप्रिलला होणार आहे. दिशाचे वडील सतिश सॅलियन यांनी ही याचिका दाखल केली...

March 22, 2025 5:08 PM March 22, 2025 5:08 PM

views 18

खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी घेतली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट

कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांनी आज नवी दिल्ली इथं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि मुंबई उपनगरी रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांबाबतचं निवेदन सादर केलं. उपनगरी रेल्वे प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी सुविध...

March 22, 2025 3:30 PM March 22, 2025 3:30 PM

views 12

नंदुरबार ग्रंथोत्सव – २०२५ ला आजपासून सुरुवात

नंदुरबार ग्रंथोत्सव - २०२५ ला आजपासून शहरात सुरुवात झाली. आज सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली, यामध्ये शालेय विद्यार्थिनींनी ग्रंथ, साहित्य आणि मान्यवरांचं औक्षण केलं.   या वेळी जेष्ठ साहित्यिक निबींजीराव बागुल, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय महासंघाचे कोषाध्यक्ष प्रविण पाटील, आदी मान्यवरांसह शिक्षक आण...

March 22, 2025 3:28 PM March 22, 2025 3:28 PM

views 8

नागपूर हिंसाचार प्रकरणी जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या एकाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. इरफान अन्सारी असं या ४० वर्षीय इसमाचं नाव आहे. १७ मार्च रोजी नागपूर इथं झालेल्या हिंसाचारात अन्सारी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते, मात्र आज त्यांचा मृत्यू झाला...

March 22, 2025 3:22 PM March 22, 2025 3:22 PM

views 9

यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. विजय केळकर यांना जाहीर

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. विजय केळकर यांना अर्थशास्त्रातल्या भरीव योगदानासाठी वर्ष २०२५साठीचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पुष्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.   या पुरस्काराचं हे ३७वं वर्ष आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच होणार...

March 22, 2025 3:17 PM March 22, 2025 3:17 PM

views 3

वाघ हल्ल्यामुळे होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यामुळे होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देंवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत.   यामध्ये गेल्या पाच वर्षात वाघ्र हल्ल्यात म्रुत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना विशेष नुकसान भरपाई देणं, अतिरिक...

March 22, 2025 3:12 PM March 22, 2025 3:12 PM

views 10

लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना न्याय्य पद्धतीने झाली पाहिजे- सुप्रिया सुळे

लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना न्याय्य पद्धतीने झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पुनर्रचनेसंदर्भात तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी बोलावलेली पहिली सर्वपक्षीय बैठक आज चेन्नई इथं झाली. &...

March 22, 2025 2:47 PM March 22, 2025 2:47 PM

views 4

नागपूर हे शांततेचं प्रतीक – माणिकराव ठाकरे

देशाच्या मध्यभागी असलेलं नागपूर हे शांततेचं प्रतीक आहे, इथं कधीही दंगली झाल्या नाहीत. हिंदू-मुस्लिम समाजाचं अतूट प्रेमाचं नातं या शहरात आहे. हे नातं तोडण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देता कामा नये, असं आवाहन काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी आज नागपूर इथं केलं.   काँग्रेस सत्यशोधन समितीनं नागपूर ...

March 22, 2025 1:05 PM March 22, 2025 1:05 PM

views 13

‘हायब्रीड ऍन्युइटी मॉडेल, फेज -१’ या प्रकल्पामुळे पायाभूत सुविधांना लक्षणीय चालना मिळाली

राज्यात पायाभूत सुविधांचं काम विलक्षण वेगानं सुरु असून ‘हायब्रीड ऍन्युइटी मॉडेल, फेज -१’ या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्याच्या पायाभूत सुविधांना लक्षणीय चालना मिळाली आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.   पायाभूत सुविधांसाठी राज्यात ४१ हजार ७३० कोटी रुपयांची गुंतवणू...

March 21, 2025 8:13 PM March 21, 2025 8:13 PM

views 18

राज्याचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर

राज्याचा २०२५-२६ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी आज मंजूर केला. विधानसभेत अर्थसंकल्पातल्या अनुदानाच्या विभागवार मागण्यांवर सभागृहात चर्चा झाली आणि त्या मंजूर झाल्या. त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजुरीसाठी महाराष्ट्र विनियोजन विधेयक सादर केलं आणि ते सभागृहानं एकमतानं...