प्रादेशिक बातम्या

March 23, 2025 9:24 AM March 23, 2025 9:24 AM

views 15

गडचिरोलीत वाघांच्या हल्ल्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात झालेल्या जिवीतहानीची गंभीर दखल घेतली आहे. गडचिरोलीत वाघांचे हल्ले रोखण्यासाठी 3 महिन्यात आराखडा तयार करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. यामध्ये, गेल्या पाच वर्षात वाघांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या नगिरकांच्या कुटुंबियांना वि...

March 23, 2025 9:05 AM March 23, 2025 9:05 AM

views 87

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना २०२५साठीचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पुष्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी काल प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच होणार असून, यात देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या चार सैनिकांचा आ...

March 23, 2025 8:59 AM March 23, 2025 8:59 AM

views 11

लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना न्याय्य पद्धतीने झाली पाहिजे – खा. सुप्रिया सुळे

लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना न्याय्य पद्धतीने झाली पाहिजे, अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर कमी लोकसंख्येच्या राज्यांना, अधिक लोकसंख्येच्या राज्य...

March 22, 2025 8:45 PM March 22, 2025 8:45 PM

views 8

नागपूर दंगलीत नुकसान झालेल्यांना येत्या ३-४ दिवसात नुकसान भरपाई मिळणार

नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दंगलीत सर्वसामान्यांच्या मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई येत्या ३-४ दिवसात देण्याच्या सूचना दिल्या आहेत. दंगलीमध्ये ७१ वाहनांचे तसेच विविध मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीची सर्व रक्कम दंगेखोरांकडून वसूल केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवे...

March 22, 2025 8:45 PM March 22, 2025 8:45 PM

views 9

कांदा निर्यातीवरचं २० टक्के शुल्क १ एप्रिलपासून हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क १ एप्रिलपासून हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातलं परिपत्रक केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या महसूल विभागानं जारी केलं. १३ सप्टेंबर २०२४ पासून हे शुल्क आकारण्यात येत होतं. २०२३-२४ या आर्थिक वर्षात देशातून १७ लाख मेट्रीक टनांहून अधिक कांदा निर्...

March 22, 2025 8:41 PM March 22, 2025 8:41 PM

views 57

प्रसिद्ध हिंदी साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

साहित्यक्षेत्रात अतिशय मानाचा मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार यंदा प्रसिद्ध हिंदी लेखक, कवी आणि निबंधकार विनोद कुमार शुक्ल यांना जाहीर झाला आहे. ११ लाख रुपये रोख, सरस्वतीची कांस्यप्रतिमा आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ८८ वर्षांचे शुक्ल, हा पुरस्कार मिळवणारे हिंदीतले बारावे, तर छत्तीसगड...

March 22, 2025 8:39 PM March 22, 2025 8:39 PM

views 10

देशातल्या शेअर बाजारांनी या आठवड्यात नोंदवली गेल्या ४ वर्षातली सर्वोत्तम तेजी

देशातल्या शेअर बाजारांनी या आठवड्यात गेल्या ४ वर्षातली सर्वोत्तम तेजी नोंदवली. या कालावधीत सेन्सेक्स ३ हजारांहून अधिक तर निफ्टी साडे ९०० हून अधिक अंकांनी वधारला. टक्केवारीचा विचार करता ही सुमारे ४ टक्के वाढ आहे. निफ्टीनं फेब्रुवारी २०२१ नंतर पहिल्यांदा आणि सेन्सेक्सनं जुलै २०२२ नंतर पहिल्यांदा एकाच ...

March 22, 2025 8:08 PM March 22, 2025 8:08 PM

views 16

महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी पुरस्कार

सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी वीज कंपनी म्हणून केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळानं महावितरणचा गौरव केला आहे. शुक्रवारी नवी दिल्ली इथं झालेल्या समारंभात महावितरणच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी हा पुरस्कार स्वीकारला.    महावितरण मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्याला वीज पुरवठा करते. कंपनीचे  घर...

March 22, 2025 7:53 PM March 22, 2025 7:53 PM

views 10

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या वेस्टर्न, सेंट्रल आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक असणार आहे.    वेस्टर्न मार्गावर सकाळी १० वाजून ३५ मिनिटं ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटं या कालावधीत यंत्रणांच्या डागडुजीसाठी जम्बोब्लॉक होणार आहे. त्यामुळे चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान जलद मार्गावर...

March 22, 2025 7:40 PM March 22, 2025 7:40 PM

views 2

१४ प्रमुख क्षेत्रांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७६४ अर्जांना मंजुरी

१४ प्रमुख क्षेत्रांसाठी पी एल आय अर्थात उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७६४ अर्जांना मंजुरी मिळाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. घाऊक औषधं, वैद्यकीय उपकरणं, औषधनिर्मिती, दूरसंचार, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रिकल उपकरणं, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग आणि ड्रोन या क्षेत्रातल्या १७६ सूक्...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.