प्रादेशिक बातम्या

April 2, 2025 7:49 PM April 2, 2025 7:49 PM

views 4

बीड जिल्हा बँकेला सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू – उपमुख्यमंत्री अजित पवार

बीड जिल्ह्यातून होणार स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न करू आणि बीड जिल्हा बँकेला सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. बीड दौऱ्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. चूक करणाऱ्यांच्या विरोधात कोणत्याही हस्तक्षेपाची पर्वा न करता कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

April 2, 2025 7:42 PM April 2, 2025 7:42 PM

views 12

वक्फ सुधारणा विधेयकाचं सत्ताधाऱ्यांकडून स्वागत, विरोधकांची टीका

भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील धर्मनिरपेक्षता वक्फ सुधारणा विधेयकातून प्रतिबिंबित होत असल्याचं प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. वक्फ सुधारणा विधेयक हे कोणत्याही धर्माच्या विरोधात किंवा कोणाच्याही आस्थेला ठेस पोहचविणारे नाही. त्यामुळे ज्यांची सद्सद्विवेकबुद्धी जिवंत आहे अश...

April 2, 2025 7:58 PM April 2, 2025 7:58 PM

views 8

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा

राज्याच्या जवळपास सर्वच भागात आज आणि उद्या अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचीही शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. भंडारा, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, ...

April 2, 2025 3:53 PM April 2, 2025 3:53 PM

views 11

धुळे तालुक्यात लागलेल्या आगीत म्हशीच्या 7 रेडक्यांचा मृत्यू

धुळे तालुक्यात आनंद खेडा गावामध्ये एका गोठ्याला मध्यरात्री लागलेल्या आगीत म्हशीच्या सात रेडक्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर दहा म्हशींना गंभीर दुखापत झाली. जिल्हा परिषद सदस्य तसंच जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन, पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

April 2, 2025 7:45 PM April 2, 2025 7:45 PM

views 6

बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अपघातात ६ जण ठार

बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरालगतच्या शेगाव मार्गावर आज पहाटे तीन वाहनं एकमेकांवर आदळल्यानं झालेल्या अपघातात ६ जण जागीच ठार तर २६ जण जखमी झाले आहेत. खासगी बसला ओव्हरटेक करणाऱ्या  बोलेरो कारला समोरून एसटी बस आणि मागून खासगी बसची धडक बसल्यानं हा अपघात घडला.

April 2, 2025 11:24 AM April 2, 2025 11:24 AM

views 17

महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळाची रूपरेषा जारी

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळाची रूपरेषा जारी केली आहे. हे महामंडळ स्थापन केल्याने नगरिकांचं तसंच खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचं सायबर गुन्ह्यापासून आणि संबंधित धोक्यांपासून संरक्षण होईल असा दावा राज्य सरकारने केला आहे.   यापूर्वी सायबर गुन्हे विभाग राज्य पोलिसांच्या ...

April 1, 2025 8:47 PM April 1, 2025 8:47 PM

views 8

महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळ निर्णय…

बाईक टॅक्सी वाहनांच्या समुच्चयक धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. त्यानुसार १ लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमधे रमानाथ झा समितीच्या शिफारशी सुधारणेसह लागू करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला.    नोंदणीकृत वाहन निष्कासन केंद्रामध्ये स्वेच्छेनं निष्कासित केलेल्या वाहनांच्य...

April 1, 2025 7:52 PM April 1, 2025 7:52 PM

views 3

ग्रामपंचायतीपर्यंत संपर्क यंत्रणा प्रस्थापित करण्याचे दूरसंवाद मंत्र्यांचे निर्देश

देशात प्रत्येक ग्रामपंचायतीला वेगवान संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी भारत नेट प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात राज्याने दमदार कामगिरी केली असून दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या उर्वरित ग्रामपंचायतीपर्यंत संपर्क यंत्रणा प्रस्थापित करावी असे निर्देश केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्...

April 1, 2025 7:46 PM April 1, 2025 7:46 PM

views 52

अवकाळी पावसामुळे पीकांचं नुकसान

सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट सुरू असून उर्वरित भागात सोसाट्याचा वारा सुरू आहे.   जालना जिल्ह्यात आज काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. घनसावंगी तालुक्यातल्या अनेक गावांमधे जोरदार पाऊस झाला. यामुळे मका, गहू आणि हरभऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.    पालघर जिल्ह...

April 1, 2025 8:49 PM April 1, 2025 8:49 PM

views 16

महाराष्ट्र राज्य शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात सामंजस्य करार

कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी, शासकीय कारभारात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगासाठी राज्य शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात आज सामंजस्य करार झाला. या भागीदारीअंतर्गत मुंबईत भूगोल विश्लेषण केंद्र, पुण्यात न्यायपूरक विज्ञान संशोधन आणि ए.आय. केंद्र, तर नागपूर - ...