देशात प्रत्येक ग्रामपंचायतीला वेगवान संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी भारत नेट प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात राज्याने दमदार कामगिरी केली असून दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या उर्वरित ग्रामपंचायतीपर्यंत संपर्क यंत्रणा प्रस्थापित करावी असे निर्देश केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
राज्यामध्ये गडचिरोलीसह दुर्गम आणि अतिदुर्गम भागात संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी राज्य शासन केंद्राला संपूर्ण सहकार्य करेल. टॉवर उभारण्यासाठी गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात संपूर्ण सुरक्षा दिली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी बैठकीदरम्यान सांगितलं.