डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्य सरकारनं मागणी केल्यास शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त मदत दिली जाईल-कृषीमंत्री

राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विमा आणि अन्य योजनांतून केंद्र सरकार पैसा पुरवत आहेच पण आवश्यकतेप्रमाणे राज्य सरकारनं मागणी केल्यास अतिरिक्त मदत दिली जाईल, असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज सांगितलं.  नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्रात कृषी विज्ञान मंडपम आणि महिला तंत्रज्ञान पार्कचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, शास्त्रज्ञ अनिल काकोडकर उपस्थित होते. शेतामालाला रास्त भाव मिळावा म्हणून शासन प्रयत्नशील असून गरजेनुसार आयात निर्यात मूल्यात बदल करुन सरकार शेतकऱ्यांना मदत करते असं चौहान म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा