प्रादेशिक बातम्या

May 30, 2025 7:40 PM May 30, 2025 7:40 PM

views 12

गोंदियामध्ये ऍल्युमिनियम तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

गोंदियामध्ये इलेक्ट्रिक खांबावरच्या ऍल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. गोंदिया जिल्ह्याच्या रावणवाडीमधल्या मुरपार इथून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून ऍल्युमिनियम कंडक्टर ताराचे तीन मोठे बंडल, इलेक्ट्रिक खांबाला लावण्यात येणारे अर्थिंग वायर, कब्जे,...

May 30, 2025 7:36 PM May 30, 2025 7:36 PM

views 15

भंडारा जिल्ह्यात बोगस खत आढळल्याप्रकरणी दोघांना अटक

भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृषी केंद्रात १२९ मेट्रिक टन बोगस खत आढळल्याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  सचिवासह दोघांना अटक झाली आहे. तर खत कंपनीचा मालक आणि वितरक याना अटक करण्यासाठी पोलीस रवाना झाले आहेत.

May 30, 2025 7:34 PM May 30, 2025 7:34 PM

views 15

सिन्दुर ऑपरेशन यशस्वी करून दाखवल्याबद्दल बीड शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन

भारतीय सैनिकांनी सिन्दुर ऑपरेशन यशस्वी करून दाखवल्याबद्दल  शौर्याला सलाम करण्यासाठी  रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बीड शहरात आज  भारत झिंदाबाद तिरंगा मोटार सायकल रॅली काढण्यात आली.  या रॅलीत महीला, रिपाइं पदाधिकारी  आणि  कार्यकर्ते हजारोच्या संखेने सामील झाले होते. 

May 30, 2025 7:20 PM May 30, 2025 7:20 PM

views 7

राज्यात विकसित कृषी संकल्प अभियानाला सुरुवात

केेंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ या देशव्यापी अभियानाला आज पालघर आणि धाराशिव मध्ये सुरुवात झाली.   गावोगावी जावून शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणं, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देणं, शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणं, आधुन...

May 30, 2025 7:03 PM May 30, 2025 7:03 PM

views 3

१ जूनपासून पावसाळी नियंत्रण कक्ष सुरु होणार

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीनं येत्या १ जूनपासून पावसाळी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात पावसामुळं उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी हा  कक्ष २४ तास सुरु राहणार आहे. मंत्रालय, बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आदी...

May 30, 2025 2:40 PM May 30, 2025 2:40 PM

views 16

पुण्यात १ जूनला गुंतवणूकदार शिबिराचं आयोजन

केंद्र सरकारच्या कंपनी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाने अर्थात आयईपीएफए ने भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डच्या सहकार्याने गुंतवणूकदार शिबिर या उपक्रमाची घोषणा केली आहे.  आयईपीएफए चं  पहिलं शिबीर १ जून रोजी पुणे इथं होईल. 

May 29, 2025 8:23 PM May 29, 2025 8:23 PM

views 14

धुळे प्रशासनाने रोखला बालविवाह

धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात पिंजारझाडी इथे होत असलेला बालविवाह प्रशासनाने रोखला.  अनुक्रमे २० आणि १६ वर्ष वयाच्या बालक आणि बालिकेचा विवाह थांबवण्यासाठी चाईल़्ड हेल्पलाईन  टीमने साक्री पोलिसांच्या मदतीने  कारवाई केली. यावेळी पालकांकडून हमीपत्रे लिहून घेण्यात आली.

May 29, 2025 8:19 PM May 29, 2025 8:19 PM

views 17

लातूर : बसनं दिलेल्या धडकेत २ जणांचा मृत्यू

लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात एका प्रवासी बसला दुसऱ्या प्रवासी बसनं दिलेल्या धडकेत २ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले. तुळजापूर लातूर महामार्गावर आशिव ते उजनी दरम्यान आज सकाळी हा  अपघात झाला. जखमींना लातूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

May 29, 2025 8:16 PM May 29, 2025 8:16 PM

views 12

भंडारा जिल्ह्यात अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं बिबट्या ठार

भंडारा जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरच्या कोकणागड फाट्याजवळ एका अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं बिबट्या जागीच ठार झाला. धारगाव परिसर हा जंगलव्याप्त असून परिसरात नेहमी वन्य प्राण्यांचा वावर असतो.    बिबट्या रस्ता ओलांडत काल रात्री साडेआठवाजता  त्याचा मृत्यू झाला असून याची माहिती वन विभागाला देण...

May 29, 2025 8:08 PM May 29, 2025 8:08 PM

views 18

राज्यात ठीकठिकाणी पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात वातावरण ढगाळ असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत, मात्र जिल्ह्यात पावसाचा जोर आता ओसरल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज सकाळपर्यंत १२ पूर्णांक ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.  सध्या जायकवाडी धरणात २९ पूर्णांक ७९ शतांश टक्के पाणीसाठा असल्याचं प्रश...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.