प्रादेशिक बातम्या

June 1, 2025 3:42 PM June 1, 2025 3:42 PM

views 13

नाशिकमधे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

त्र्यंबकेशर आणि नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक इथं १३ प्रमुख आखाड्यांचे महंत, साधुसंत, सर्व प्रमुख पुरोहीत संघाचे प्रतिनिधी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली.    कुंभमेळ्याच्या आयोजनाच्या दृष्टीनं करायच्या कामांसाठी ४ हजार कोटी रुपयांच्या...

June 1, 2025 3:28 PM June 1, 2025 3:28 PM

views 8

मान्सूनचा प्रवास रखडल्यानं पेरणीची घाई न करण्याचा कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

बदललेल्या वातावरणामुळं मान्सूनचा प्रवास सध्या रखडलेला असून, १० जूनपर्यंत राज्यात पावसाचं प्रमाण कमीच राहाणार आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागानं विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांना दिला आहे. किमान १० जूनपर्यंत राज्यात बहुतांश भागात  हवामान कोरडं ...

June 1, 2025 1:57 PM June 1, 2025 1:57 PM

views 11

आज जागतिक दूध दिवस साजरा

लाखो लोकांच्या उपजीविकेचा स्रोत तसंच जागतिक अन्न म्हणून दुधाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आज जागतिक दूध दिवस साजरा होत आहे. जागतिक पातळीवर दुधाचं उत्पादन दोन टक्क्यानी वाढतं. पण भारतात वाढीचं प्रमाण ५ पूर्णांक ७ दशांश टक्के आहे. त्यामुळे जगातला सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश म्हणून भारत ओळखला ...

June 1, 2025 1:32 PM June 1, 2025 1:32 PM

views 12

मुख्यमंत्री सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक घेणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर असून ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी नाशिक मधल्या तीन आणि त्र्यंबकेश्वर मधल्या दहा आखाड्यांचे महंत उपस्थित राहणार आहेत. नाशिकमधल्या कुंभमेळा पर्वाच्या तारखा यावेळी घोषित केल्या जातील. यानंतर महाराष्ट्र आरोग...

May 31, 2025 6:29 PM May 31, 2025 6:29 PM

views 9

कटरा रेल्वे स्थानक ते मुंबई पहिली समर्पित चेरी मालवाहतूक सेवा आजपासून सुरू

जम्मू आणि काश्मिरमध्ये भारतीय रेल्वेनं फलोत्पादन विभागाच्या सहकार्यानं कटरा रेल्वे स्थानक ते मुंबई पहिली समर्पित चेरी मालवाहतूक सेवा आजपासून सुरू केली. यामुळे, जम्मू काश्मिरच्या फलोत्पादन क्षेत्राला आणि त्याच्या मुख्य बाजारपेठांशी संपर्क यंत्रणेला प्रोत्साहन मिळणार आहे. नाशवंत मालाला मुख्य बाजारपेठे...

May 31, 2025 6:22 PM May 31, 2025 6:22 PM

views 18

पालघरमधे मेंढवन घाटात अपघातात दोघांचा मृत्यू

पालघरमधे मेंढवन घाटात आज कार आणि कंटेनरच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही कार गुजरातहून मुंबईकडे येत होती. कारची कंटेनरला पाठीमागून धडक बसल्याने हा अपघात झाला.

May 31, 2025 6:21 PM May 31, 2025 6:21 PM

views 32

अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं कार्य तीनशे वर्षांनीही प्रेरणादायी-मुख्यमंत्री

अहिल्याबाई होळकर यांच्या राजवटीत कृषी, कर आणि न्याय पद्धती आदर्श होती. त्यांनी केलेलं कार्य तीनशे वर्षांनीही प्रेरणादायी आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं आयोजित जयंती उत्सवात ते बोलत होते. यावेळी  विविध विकासकामांचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच...

May 31, 2025 3:21 PM May 31, 2025 3:21 PM

views 14

अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी त्यांची जयंती साजरी

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी या अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी त्यांची जयंती साजरी होत आहे. जयंतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे उपस्थित आहेत. यावेळी  विविध विकासकामांचा आज प्...

May 31, 2025 3:14 PM May 31, 2025 3:14 PM

views 16

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी अधिकारी आणि कर्मच...

May 30, 2025 7:41 PM May 30, 2025 7:41 PM

views 12

धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस

राज्यात गेल्या २४ तासात धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ४२ पूर्णांक २ दशांश मिलीमीटर पाऊस झाला. बीड जिल्ह्यात २४ मिलीमीटर, तर जालना जिल्ह्यात १३ पूर्णांक ९ दशांश मिलीमीटर इतक्या सरासरी पावसाची नोंद झाली आहे. सध्या  राज्यात परिस्थिती नियंत्रणात असून कुठेही पूर परिस्थिती उद्भवलेली नाही.    धाराशिव...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.