राष्ट्रीय

January 10, 2025 10:06 AM

views 39

तीन दिवसीय चिंतन शिबीराचं उद्घाटन मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते होणार

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आज राजस्थानमधल्या उदयपूर इथं आयोजित तीन दिवसीय चिंतन शिबीराचं उद्घाटन करणार आहेत. सरकारच्या विविध योजनांसह महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या प्रमुख उपक्रमांचा आढावाही या चिंतन शिबिरात घेण्यात येणार आहे. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे म...

January 10, 2025 11:05 AM

views 23

‘एरो इंडिया २०२५’ हवाई प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पुढील महिन्यात बेंगळुरू इथे होणाऱ्या 'एरो इंडिया 2025' या आशियातील सर्वात भव्य हवाई प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत, राजदूतांच्या गोलमेज बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला, भारताचे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या 150 हून अधिक देशांचे राजद...

January 9, 2025 8:21 PM

views 31

उद्यापासून आकाशवाणीतर्फे ‘कुंभ वाणी’ ही नवीन वृत्तवाहिनी सुरु होणार

महाकुंभमेळ्याला वाहिलेली ‘कुंभ वाणी’ नावाची नवीन वृत्तवाहिनी आकाशवाणीतर्फे सुरु होणार असून तिचं उद्घाटन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात नव्या ‘कुंभ मंगल धून’ चं  पहिलं सादरीकरण होणार आहे. कुंभ वाणी या वाहिनीवर उद्यापासून २६ फेब्रुवारीपर्यंत...

January 9, 2025 8:14 PM

views 22

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ३ नक्षली ठार

छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ३ नक्षली ठार झाले. सुकमा आणि विजापूर या जिल्ह्यांच्या सीमेवरच्या जंगलात जिल्हा राखीव पोलीस दल, विशेष कृती दल आणि कोब्रा बटालियनचं संयुक्त पथक नक्षली विरोधी मोहिमेवर असताना ही चकमक सुरू झाली. बराच वेळ ही चकमक सुरु होती.

January 9, 2025 8:12 PM

views 22

‘सेंद्रिय शेती’ अधिक उत्पन्न आणि उत्तम रोजगार मिळवून देणारं माध्यम – मंत्री पियुष गोयल

सेंद्रिय शेती हे अधिक उत्पन्न आणि उत्तम रोजगार मिळवून देणारं माध्यम आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमाच्या ८ व्या भागाचं उद्घाटन करताना ते आज नवी दिल्लीत बोलत होते. सध्या देशाच्या सेंद्रिय उत्पादनांची  निर्यात सहा हजार कोटी र...

January 9, 2025 7:59 PM

views 12

जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी जग भारताकडे आशेने पाहत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

विविध जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आज जग भारताकडे आशेने पाहत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत आयोजित जीनोमिक्स डेटा कॉन्क्लेव्हला व्हीडीओ संदेशाद्वारे संबोधित करत होते. जीनोम इंडिया प्रकल्प हा देशाच्या जैवतंत्रज्ञान विषयातला एक निर्णायक प्रकल्प असल्याचं ते म्हण...

January 9, 2025 6:53 PM

views 19

२०३०पर्यंत ५०% बिगरजीवाश्म इंधनाचा पर्याय स्वीकारण्यासाठी भारत वचनबद्ध – मंत्री प्रल्हाद जोशी

शाश्वत भविष्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून, २०३० सालापर्यंत ५० टक्के बिगर जीवाश्म इंधनाचा पर्याय स्वीकारण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत नवीकरणीय ऊर्जा या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद...

January 9, 2025 8:05 PM

views 31

सरकारनं भारताला ऊर्जा निर्यात करणारा देश म्हणून बदललं – मंत्री नितीन गडकरी

सरकारनं देशाला ऊर्जा आयात करणाऱ्या देशाऐवजी ऊर्जा निर्यात करणारा देश म्हणून बदललं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज मध्य प्रदेशातल्या पिठमपूर इथल्या राष्ट्रीय वाहन चाचणी केंद्रानं आयोजित कार्यक्रमात बोलत होते.    भारत आता पारंपारिक ऊर्जेच्या ...

January 9, 2025 2:31 PM

views 17

राष्ट्रपती आजपासून ओडिशा आणि मेघालयाच्या दौऱ्यावर

या परिषदेचा समारोप उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपतींचं आज भुवनेश्वरमध्ये आगमन होणार आहे. राष्ट्रपती उद्या परिषदेत प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारही प्रदान करणार आहेत. राष्ट्रपती आजपासून ओडिशा आणि मेघालयाच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती आज मेघालयमध्ये उमियममध्ये आयसीएआ...

January 9, 2025 1:42 PM

views 11

उत्तर भारतात थंडीची लाट आणखी तीव्र

उत्तर भारताच्या बहुतेक सर्व भागात थंडीची लाट आणखी तीव्र झाली आहे. या ठिकाणी तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पश्चिमेकडच्या वाऱ्यांमुळे आठवड्याच्या उत्तरार्धात वायव्य भारताच्या काही भागात पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे.    हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, पश्च...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.