राष्ट्रीय

January 10, 2025 8:01 PM

views 19

दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी

दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील. तर २० जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागं घेता येतील. या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

January 10, 2025 7:09 PM

views 12

महाराष्ट्राला मिळणार १० हजार ९३० कोटी रुपयांहून अधिक निधी- देवेंद्र फडणवीस

केंद्र शासनाकडून सर्व राज्यांना आज एक लाख ७३ हजार ३० कोटी रुपयांचं कर हस्तांतरण जारी करण्यात आलं. यात महाराष्ट्र राज्याचा १० हजार ९३० कोटी ३१ लाख रूपयांचा वाटा आहे. यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये सरकाने ८९ हजार ८६ कोटी रुपयांच्या कराचा वाटा राज्यांना दिला आहे.   भांडवली खर्चाला गती देण्यासाठी आणि ...

January 10, 2025 7:05 PM

views 30

महाकुंभमेळ्यानिमित्त आकाशवाणीची विशेष वाहिनी ‘कुंभवाणी’चं लोकार्पण

उत्तर प्रदेशात होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या आकाशवाणीच्या 'कुंभवाणी' वाहिनीचं लोकार्पण आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते प्रयागराज इथे झालं. महाकुंभ मेळा हा उत्सव जाती धर्मापलिकडे जाऊन एकतेचा संदेश देतो असं ते यावेळी म्हणाले. याच कार्यक्रमात त्यांनी 'कु...

January 10, 2025 1:37 PM

views 25

NCCचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्या हस्ते कल्पना आणि आणि नवोन्मेष स्पर्धेचं उद्घाटन

भारतीय छात्र सेना-NCC चे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांनी नवी दिल्लीत कल्पना आणि आणि नवोन्मेष स्पर्धेचं आज उद्घाटन केलं. हा मंच युवा वर्गाला त्यांचे विचार आणि नवीन कल्पना मांडण्याची संधी देत असल्याचं सिंह यांनी सांगितलं. एनसीसीतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या विविध शिबिरांमधून तज्ज्ञांकडून छ...

January 10, 2025 1:25 PM

views 19

केंद्र सरकार खासगी कंपन्यांच्या सहकार्याने रेल्वेगाड्यांच्या चाकांची निर्मिती करणार – मंत्री अश्विनी वैष्णव

मेक इन इंडिया योजनेंतर्गत केंद्र सरकार खासगी कंपन्यांच्या सहकार्याने रेल्वेगाड्यांच्या चाकांची निर्मिती करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली. तामिळनाडूमध्ये तिरुवल्लूर इथे दोन कंपन्यांच्या चाक निर्मिती विभागांना भेट दिल्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. सध्या रेल...

January 10, 2025 1:07 PM

views 15

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात १३ माओवाद्यांची शरणागती

छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात १३ माओवाद्यांनी पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. या माओवाद्यांवर एकूण १३ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. छत्तीसगड सरकारच्या पुनर्वसन धोरणांतर्गत आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये द...

January 10, 2025 1:15 PM

views 38

‘लिंगभाव समानता आणि महिला सबलीकरण हे भारताच्या परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे अविभाज्य घटक’

लिंगभाव समानता आणि महिला सबलीकरण हे भारताच्या परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे अविभाज्य घटक असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी आज केलं. भुवनेश्वरमध्ये सुरू असलेल्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या चौथ्या दिवसाच्या अध्यक्षपदाच्या भाषणात ते बोलत होते. डायस्पोरा दिवस ...

January 10, 2025 10:17 AM

views 24

काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध सीबीआयची कारवाई

केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयनं भ्रष्टाचाराच्या कथित प्रकरणात काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध नवीन प्राथमिक तपासणी अहवाल दाखल केला आहे. हे प्रकरण कार्ती चिदंबरम आणि त्यांच्या एका जवळच्या सहाय्यकाच्या नियंत्रणाखाली असलेल्या एका कंपनीवर मद्यविक्रीसाठी घातलेली बंदी उठवण्याच्या कथि...

January 10, 2025 1:04 PM

views 13

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद २०२५’ला आजपासून सुरुवात

'विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2025 नवी दिल्लीत भारत मंडपम इथे आजपासून  सुरुवात होत आहे. विकसित भारताच्या निर्माणाकरिता, तरुणांना नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळवून द्यावं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. देशभरातून सुमारे 30 लाख युवक युवतींनी यात सहभाग नोंदवला असून आजच्या परिषदेत सह...

January 10, 2025 1:47 PM

views 29

हिमालयीन प्रदेशात पुढचे दोन दिवस थंडीची लाट कायम

देशात अनेक राज्यांत थंडीची लाट आणि घनदाट धुक्याची चादर कायम आहे. राजधानी नवी दिल्ली आणि एनसीआर परिसरात दाट धुक्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे. रेल्वे, हवाई वाहतुकीवर तसंच रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. आज सकाळी दृश्यमानता अधिकच खराब असल्यानं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुमारे ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.