राष्ट्रीय

February 1, 2025 2:00 PM February 1, 2025 2:00 PM

views 7

आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची घोषणा

देशभरातल्या शंभर आकांक्षित जिल्ह्यांमध्ये राज्यांच्या सहकार्याने प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना राबवणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडताना लोकसभेत सांगितलं. उत्पादन वाढवणं, शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करणं, पंचायत आणि गट स्तरावर साठवणुकीची क्षमता वाढवणं, सिंचन सुविधा सुधारणं, दीर्घकालीन आण...

February 1, 2025 1:55 PM February 1, 2025 1:55 PM

views 8

१२ लाखापर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त, त्यापुढील उत्पन्नावरच्या करांच्या दरातही कपात

पुढच्या आठवड्यात नवीन आयकर विधेयक आणण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली. टॅक्स रिबेटच्या सोयीमुळं १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना नवीन कर रचनेनुसार कुठलाही आयकर द्यावा लागणार नाही, अशी मध्यमवर्गासाठी खूषखबर त्यांनी आजच्या भाषणात दिली. नोकरदारांना ७५ हजार रुपयांचं standard deduction मिळत असल...

February 1, 2025 1:54 PM February 1, 2025 1:54 PM

views 7

गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांना प्राधान्य देणारा, सर्वांचा विकास साधणारा अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला. या माध्यमातून येत्या ५ वर्षात सर्वांचा विकास करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यात गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे. आर्थिक वृद्धीला चालना, सर्वंकष वि...

January 31, 2025 8:27 PM January 31, 2025 8:27 PM

views 14

सोने आणि चांदीचे दर विक्रमी पातळीवर

देशात सोने आणि चांदीचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. मुंबईच्या बाजारपेठेत २४ कॅरेट सोनं कॅरेटमागे ८२ हजार रुपयांच्या पलीकडे गेलं. २२ कॅरेट सोनं ८० हजार १२० रुपये तोळा या दराने मिळत होतं. कालच्या तुलनेत सोनं आज सुमारे ८०० रुपयांनी महागलं. एक किलो चांदी ९३ हजार ५०० रुपये दराने मिळत होती.

January 31, 2025 7:51 PM January 31, 2025 7:51 PM

views 2

Economic Survey : देशाचा वास्तविक GDP वृद्धीदर चालू आर्थिक वर्षात ६.४ % राहील

देशाचा वास्तविक जीडीपी वृद्धीदर चालू आर्थिक वर्षात ६ पूर्णांक ४ दशांश टक्के राहील असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२४-२५ या वर्षातल्या आर्थिक पाहणीचा अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे  सादर केला. कृषी आणि सेवा क्षेत्राच्या पाठबळावर देशा...

January 31, 2025 3:20 PM January 31, 2025 3:20 PM

views 6

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं आज सकाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा  प्रारंभ झाला. त्यानंतर दोन्ही सदनांचं कामकाज सुरु झालं.    लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी देशाच्या विकासात माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. तसंच मनमोहन सिंग, ओमप्रकाश चौटाला आणि ३ ...

January 31, 2025 3:12 PM January 31, 2025 3:12 PM

views 11

प्रयागराज दुर्घटना : न्यायलयीन आयोगाची संगम घाटाला भेट

प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यात नुकत्याच झालेल्या चेंगराचेगरीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेला न्यायालयीन आयोग आज संगम घाटाला भेट देत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती हर्ष कुमार यांच्या नेतृत्वाखाली हा त्रिसदस्यीय आयोग राज्यसरकारने स्थापन केला आहे. उत्तरप्रदेशच...

January 31, 2025 2:46 PM January 31, 2025 2:46 PM

views 2

महिलांच्या योगदानाशिवाय देश समृद्ध होऊ शकत नाही – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

महिलांच्या योगदानाशिवाय देश समृद्ध होऊ शकत नाही, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. देशात प्रथमच लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षण देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या म...

January 31, 2025 3:14 PM January 31, 2025 3:14 PM

views 15

देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन

देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्यासारख्या थोर नेत्यांनी दिलेली एकतेची शपथ आठवून आणि देश संरक्षणात प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांकडून प्रेरणा घेऊन  सर्व नागरिकांनी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज अर्थसंकल्पीय अधिवेश...

January 31, 2025 1:46 PM January 31, 2025 1:46 PM

views 10

स्वातंत्र्यप्राप्तीच्या शतकपूर्तीपर्यंत देश विकसित भारताचा संकल्प पूर्ण करेल – प्रधानमंत्री

देशातल्या मतदारांनी आपल्या सरकारवर तिसऱ्यांदा विश्वास व्यक्त केला असून यावेळचा अर्थसंकल्प या कार्यकाळातला पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दिल्लीमध्ये आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी  प्रसारमाध्यमांना ते संबोधित करत होते. भारताने लोकशाही र...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.