राष्ट्रीय

June 24, 2025 10:43 AM

views 9

ॲक्झीओम-4 या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचं उद्या प्रक्षेपण

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा समावेश असलेलं ॲक्झीओम-4 या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचं प्रक्षेपण उद्या होण्याची शक्यता आहे. नासाच्या अधिकृत संकेतस्थळांवरील माहितीनुसार, नासा, ॲक्झीओम स्पेस आणि स्पेसएक्स त्यांच्या या चौथ्या खासगी अंतराळवीर मिशनसाठी आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेनुसार, उद्या दुपारी...

June 24, 2025 10:41 AM

views 31

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली चीनच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांची भेट

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या चीनच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी बीजिंगमध्ये चिनचे परराष्ट्र व्यवहारमंत्री वांग यी यांची भेट घेतली. आशियायी प्रदेशामध्ये शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा एकत्रितपणे सामना करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. या बै...

June 24, 2025 10:39 AM

views 18

महात्मा गांधी आणि श्रीनारायण गुरू यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

महात्मा गांधी आणि महान आध्यात्मिक नेते श्री नारायण गुरू यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या घटनेला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत होणार आहे. 12 मार्च 1925 रोजी शिवगिरी मठात महात्मा गांधी आणि श्री नाराय...

June 24, 2025 9:49 AM

views 13

तेलाच्या किमतींमध्ये ५ वर्षांतील सर्वांत मोठी घसरण

कतारमधील अल उदेद अमेरिकन हवाई तळावर इराणनं केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर तेलाच्या किमतींमध्ये पाच वर्षांतील सर्वांत मोठी एका दिवसातील घसरण नोंदवली गेली. तेलाच्या किमती प्रति बॅरल पाच डॉलर्सने घसरल्या. ऊर्जा पायाभूत सुविधांना थेट धोका नसल्यामुळे तेल पुरवठा खंडित होण्याची शक्यता कमी असल्याची खात...

June 23, 2025 1:39 PM

views 4

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या शहीद दिनी आज देश त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली. आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात मोदी म्हणाले की, डॉक्टर मुखर्जी यांनी देशाची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी अतुलनीय धैर्य दाखवत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. र...

June 23, 2025 3:08 PM

views 98

कच्च्या तेलाच्या दरात वाढ

अमेरिकेने इराणवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या दरात आज वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत दोन टक्क्यानी वाढून ७९ डॉलर प्रति बॅरल इतकी झाली आहे तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलची किंमत ७५ डॉलर प्रति बॅरल इतकी झाली आहे. गेल्या पाच महिन्यातली ही सर्वोच्च वाढ आहे. मध्य आशियामधे सुरू असलेल्...

June 23, 2025 10:27 AM

views 22

देशातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. महाराष्ट्रातही येत्या 24 तासात रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात आणि पुणे घाट परिसरात मुसळधार पाऊस पडेल. तर कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  

June 23, 2025 1:11 PM

views 27

ऑपरेशन सिंधू अंतर्गत १,७१३ भारतीय मायदेशी परतले

इराणहून मायदेशी परतलेल्या २८५ प्रवाशांचं परराष्ट्र व्यवहारमंत्री पबित्र मार्गारेटा यांनी रात्री दिल्ली विमानतळावर स्वागत केलं. ऑपरेशन सिंधु अंतर्गत आतापर्यंत १,७१३ भारतीयांना मायदेशी आणल्याची माहिती त्यांनी दिली.   इस्रायलमधून घरी परतणाऱ्या श्रीलंकेच्या नागरिकांसाठी भारतानं अम्मान ते नवी दिल्ली...

June 22, 2025 7:56 PM

views 23

EPFOच्या सदस्यांमध्ये १९ लाखांहून अधिक सदस्यांची वाढ

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या सदस्यांमध्ये  एप्रिल २०२५ मध्ये १९ लाखांहून अधिक सदस्यांची वाढ झाली आहे.  गेल्या महिन्याच्या तुलनेत ही वाढ तीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या नवीन सदस्यांमध्ये 2 लाखांहून अधिक महिला सदस्यांचा समावेश आहे.

June 22, 2025 7:53 PM

views 24

नक्षलवादाचं उच्चाटन करण्याचा सरकारचा संकल्प – गृहमंत्री अमित शाह

सुसंस्कृत समाजात हिंसा आणि दहशतवादाला स्थान नाही, सरकारने नक्षलवादाचं उच्चाटन करण्याचा संकल्प  केला आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं. अमित शहा दोन दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यावर आहेत. नवा रायपूर मधे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिवर्सिटी आणि सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबरोटरीच्या इमार...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.