जम्मू-काश्मीरमध्ये आज संध्याकाळी पाच वाजता ‘व्यापक नागरिक सुरक्षा मॉक ड्रील’ आयोजित करण्यात येणार आहे. आपत्कालीन इशाऱ्यांचं अनुकरण करत जम्मू काश्मिरमध्ये अनेक ठिकाणी यावेळी सायरन सक्रीय केले जातील. मॉक ड्रीलमध्ये नियंत्रित हवाई हल्ल्यांदरम्यान सायरन सक्रीय करणं, नागरी परिसरात ब्लॅकआऊट प्रोटॉकॉल आणि ड्रोन हल्ल्यांच्या स्थितीत सैनिकी छावणी जवळून कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत उपाय योजना करणं आदींचा यात समावेश आहे.
Site Admin | May 31, 2025 1:41 PM | Jammu & Kashmir
जम्मू-काश्मीरमध्ये व्यापक नागरिक सुरक्षा मॉक ड्रीलचं आयोजन
