डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मिझोराममध्ये भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू

मिझोराममध्ये गेल्या ३ दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत किमान ५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. चंफाई जिल्ह्यात म्यानमार सीमारेषेजवळ झालेल्या भूस्खलनात एकाच कुटुंबातल्या २ महिलांसह तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामपरिषदेच्या अध्यक्षांनी आकाशवाणी प्रतिनिधीला दिली. 

 

सेरछिप जिल्ह्यात भूस्खलनामुळे एकाचा मृत्यू झाला तर अनेक इमारतींची पडझड झाली. सेरछिप-ऐझवाल दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर मोठी दरड कोसळल्यानं हा महामार्ग बंद करण्यात आला आहे.  

 

लाँगटलाई शहरातही भूस्खलनामुळे एका उपहारगृहासह सहा इमारती कोसळल्या असून ढिगाऱ्याखाली अनेक रहिवासी अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या सर्व ठिकाणी एसडीआरएफची पथकं तसंच स्थानिक प्रशासनानं बचावकार्य सुरू केलं आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा