राष्ट्रीय तपास संस्थेनं पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी प्रकरणात आठ राज्यांमधील १५ ठिकाणी शोध मोहीम राबवली आहे. दिल्ली, मुंबई, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आसाम आणि पश्चिम बंगालमधील पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्हशी संबंधित संशयितांच्या ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली असं एनआयएनं एका निवेदनात सांगितलं. शोध मोहिमेदरम्यान अनेक इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि संवेदनशील आर्थिक कागदपत्रं तसंच इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आलं. एनआयएच्या तपासानुसार, संशयितांचे पाकिस्तानी कार्यकर्त्यांशी संबंध होते आणि ते भारतात हेरगिरी कारवाया करण्यासाठी आर्थिक मदत करणारे म्हणून काम करत होते.
Site Admin | June 1, 2025 10:05 AM | NIA
NIAची ८ राज्यांमध्ये शोधमोहीम
