राष्ट्रीय

June 6, 2025 8:35 PM June 6, 2025 8:35 PM

views 11

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्लीत भारतीय भाषा विभागाचं उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत भारतीय भाषा विभागाचं उद्घाटन केलं. विदेशी भाषांच्या प्रभावापासून प्रशासनाला मुक्त करण्याच्या दिशेनं हे एक पाऊल असल्याचं ते म्हणाले.  

June 6, 2025 8:32 PM June 6, 2025 8:32 PM

views 6

फरार उद्योगपती मेहुल चोकसी याची बँक खाती, म्युच्युअल फंड्स आणि समभाग जप्त

फरार उद्योगपती मेहुल चोकसी याच्याकडून दोन कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम वसूल करण्यासाठी त्याची बँक खाती, म्युच्युअल फंड्स आणि समभाग जप्त करायचे आदेश सेबीनं आज दिले. गीतांजली जेम्स या त्याच्या कंपनीच्या समभागांमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी त्याला सुनावलेल्या दंडाची ही रक्कम आहे.  

June 6, 2025 8:30 PM June 6, 2025 8:30 PM

views 6

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत गतविजेता कार्लोस अल्काराज याचा सामना लॉरेंजो मुसेटी याच्याशी सुरू

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आज गतविजेता कार्लोस अल्काराज याचा सामना लॉरेंजो मुसेटी याच्याशी सुरू आहे. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात अग्रमानांकित यानिक सिनरसमोर सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा मानकरी असलेला नोव्हाक ज्योकोविचचं आव्हान असेल. महिला एकेरीच्या अंतिम फेर...

June 6, 2025 8:28 PM June 6, 2025 8:28 PM

views 5

केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते नवी दिल्लीत उमीदच्या केंद्रीय पोर्टलचं अनावरण

केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज नवी दिल्लीत उमीदच्या केंद्रीय पोर्टलचं अनावरण केलं. वक्फ मालमत्ता व्यवस्थापन आणि प्रशासनात उमीद सेंट्रल पोर्टलमुळे पारदर्शकता येईल असं रिजिजू यांनी म्हटलं आहे. नवीन वक्फ मालमत्तेची नोंदणी, वक्फ तपशील दाखल करणं, औकाफच्या रजिस्टरची देखभाल, यासह विविध ...

June 6, 2025 8:25 PM June 6, 2025 8:25 PM

views 18

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महिना अखेरीला कॅनडामध्ये होणाऱ्या जी-सेव्हन शिखर परिषदेला उपस्थित राहणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस कॅनडामध्ये होणाऱ्या जी- सेव्हन शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. जी- सेव्हन शिखर परिषदेसाठी कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी आमंत्रित केल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसंच कार्नी यांना निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल...

June 6, 2025 8:23 PM June 6, 2025 8:23 PM

views 13

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ११ वर्ष पूर्ण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ११ वर्ष पूर्ण झाली असून या काळात सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी सरकारनं विविध पावलं उचलली आहेत. ऐकूया एक आढावा…गेल्या दशकात भारताचा समृद्ध वारसा आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचं पुनरुज्जीवन झालं आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्...

June 6, 2025 8:22 PM June 6, 2025 8:22 PM

views 76

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात अर्धा टक्के कपात, शेअर बाजारात जोरदार तेजी

रिझर्व्ह बँकेनं आज द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. पतधोरण समितीनं रेपो दरात अर्धा टक्के कपात केली आहे. आता रेपो दर साडेपाच टक्के झाला आहे. फेब्रुवारीपासून सलग तिसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कपात केली असून या कालावधीत रेपो दर एकूण १ टक्क्यानं कमी झाला आहे. चालू आर्थिक वर्षात चलनफुगवट्याचा दर...

June 6, 2025 8:21 PM June 6, 2025 8:21 PM

views 16

काश्मिर ते कन्याकुमारी रेल्वेमार्गानं जोडणाऱ्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

देश आता काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत रेल्वे मार्गाने जोडला गेला असून चिनाब आणि अंजी हे पूल जम्मू-काश्मीरसाठी समृद्धीचं प्रवेशद्वार होतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. ते आज जम्मू आणि कश्मीरमध्ये ४६ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध पायाभूत प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी बोलत होते. यावेळी त्...

June 6, 2025 8:16 PM June 6, 2025 8:16 PM

views 6

तहव्वुर हुसैन राणाच्या न्यायालयीन कोठडीत ९ जुलैपर्यंत वाढ

दिल्ली न्यायालयानं २६/११ मुंबई हल्ल्यातला आरोपी तहव्वुर हुसैन राणा याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत पुढील महिन्याच्या ९ तारखेपर्यंत वाढवली आहे. राणाच्या वकिलाने त्याच्या आरोग्याच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केल्यावर पटियाला हाऊस कोर्टानं तिहार जेल अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.

June 6, 2025 7:36 PM June 6, 2025 7:36 PM

views 3

शेअर बाजारात रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीचा जोरदार परिणाम

रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीचा जोरदार परिणाम आज शेअर बाजारात दिसून आला. सेन्सेक्स ७४७ अंकांनी वधारुन ८२ हजार १८९ अंकांवर बंद झाला. निफ्टी २५२ अंकांची वाढ नोंदवत २५ हजार ३ अंकांवर स्थिरावला. बँका आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातले समभाग आज तेजीत होते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.