फरार उद्योगपती मेहुल चोकसी याच्याकडून दोन कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम वसूल करण्यासाठी त्याची बँक खाती, म्युच्युअल फंड्स आणि समभाग जप्त करायचे आदेश सेबीनं आज दिले. गीतांजली जेम्स या त्याच्या कंपनीच्या समभागांमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी त्याला सुनावलेल्या दंडाची ही रक्कम आहे.