केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज नवी दिल्लीत उमीदच्या केंद्रीय पोर्टलचं अनावरण केलं. वक्फ मालमत्ता व्यवस्थापन आणि प्रशासनात उमीद सेंट्रल पोर्टलमुळे पारदर्शकता येईल असं रिजिजू यांनी म्हटलं आहे. नवीन वक्फ मालमत्तेची नोंदणी, वक्फ तपशील दाखल करणं, औकाफच्या रजिस्टरची देखभाल, यासह विविध कामासांठी या पोर्टलची निर्मिती केली आहे. तसंच वक्फ आणि संबंधित मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी एकल-चरण प्रक्रिया, ओटीपी पडताळणीद्वारे लॉगिन ही या पोर्टलची वैशिष्ट्य आहेत. यामुळे डेटा अखंडता राहील आणि अनधिकृत नोंदी रोखण्यास मदत मिळेल.
Site Admin | June 6, 2025 8:28 PM
केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते नवी दिल्लीत उमीदच्या केंद्रीय पोर्टलचं अनावरण
