डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 6, 2025 8:23 PM | PM Modi

printer

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ११ वर्ष पूर्ण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ११ वर्ष पूर्ण झाली असून या काळात सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी सरकारनं विविध पावलं उचलली आहेत. ऐकूया एक आढावा…गेल्या दशकात भारताचा समृद्ध वारसा आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचं पुनरुज्जीवन झालं आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्त आयोजित आझादी का अमृत महोत्सवासारख्या मोहिमेअंतर्गत देशभरात सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित झाले. भारताच्या स्वातंत्र्यसेनानींचा सन्मान करण्यासाठी, त्यांचा वारसा जपण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले. प्रधानमंत्री संग्रहालय, राष्ट्रीय पोलिस स्मारक, आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालये, भारत मंडपम आणि नवीन संसद इमारत यांचं लोकार्पण झालं.

 

एक भारत, श्रेष्ठ भारत उपक्रम, काशी तमिळ संगमम आणि महाकुंभ यामध्ये ६६ कोटींहून अधिक जण सहभागी झाले. तसंच बौद्ध शिखर परिषद आणि शीख गुरुंच्या प्रकाश पर्व यासारख्या कार्यक्रमांनी भारताच्या आध्यात्मिक वारशाला बळकटी दिली. गेल्या दशकात योग ही एक जागतिक चळवळ बनली आहे. आयुष व्हिसा, जागतिक आरोग्य संस्थेशी भागीदारी यामुळे आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळत आहे. गेल्या दहा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताचं स्थान वाढलं असून भारतात ४३ जागतिक वारसा स्थळं आहेत. याशिवाय, वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट सारखे कार्यक्रम जागतिक व्यासपीठावर भारताच्या माध्यम आणि मनोरंजन प्रतिभेचे प्रदर्शन करत आहेत. भारतीय सण-उत्सव, योगा, संगीत आणि कलेला अनेक देशांमध्ये सन्मान मिळतो आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा