June 24, 2025 5:50 PM

views 17

ऑपरेशन सिंदूरमुळे भारताचं दहशतवादाविरोधातलं ठाम धोरण स्पष्ट झालं-प्रधानमंत्री

ऑपरेशन सिंदूरमुळे भारताचं दहशतवादाविरोधातलं ठाम धोरण स्पष्ट झालं, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.  ते आज नवी दिल्ली इथं केरळमधील समाजसुधारक श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्यातल्या ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभात बोलत होते. दहशतवाद्यांची आश्रयस्थानं आता सुरक्षित नाहीत, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.  आजच्या भारतात केवळ राष्ट्रहिताचे निर्णय घेतले जातात तसंच भारताचं इतर देशांवरचं लष्करी अवलंबित्व कमी होत आहे, देश संरक्षणदृष्ट्या स्वावलंबी होत आहे,  हे प्रधानमं...

June 2, 2025 7:15 PM

views 26

जागतिक हवाई वाहतूक उद्योगात भारताचं महत्त्व वाढलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

जागतिक हवाई वाहतूक उद्योगात भारताचं महत्त्व वाढलं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे IATA अर्थात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या ८१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते आज बोलत होते. जागतिक हवाई वाहतूक उद्योगात भारत एक आघाडीची शक्ती म्हणून उदयाला येत आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. ‘उडान’ योजना ही भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रातलं सुवर्णपान असून देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रात भारताने जगात तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतल्याचं त्यांनी सांगितलं. &nbs...

June 2, 2025 3:05 PM

views 20

प्रधानमंत्री आणि पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पॅराग्वेचे अध्यक्ष सॅंटियागो पेना पॅलासिओस यांच्यात नवी दिल्ली येथे शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण क्षेत्रांचा आढावा घेतला. दोन्ही देशांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान, शेती, संरक्षण, रेल्वे, अंतराळ यासह इतर क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दोन्ही देश एकसाथ असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले.    पॅलासिओस हे आज सकाळी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत पोहोचले. परराष्ट्...

June 1, 2025 6:39 PM

views 22

प्रधानमंत्री आणि आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची नवी दिल्ली इथे भेट घेतली. या भेटीविषयी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये प्रधानमंत्री म्हणाले की, गेल्या दशकात भारताच्या जलद परिवर्तनामुळे असंख्य लोक सक्षम झाले असून या प्रगतीचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत, असं मोदी म्हणाले.   या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्या. पुढच्या पाच वर्षांत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, मेट्रो सेवेचं जाळं विस्तारण्यासाठी, शहरातल्या सुविधांचं आधुनिकीकरण करण्या...

May 28, 2025 2:33 PM

views 29

प्रधानमंत्री उद्यापासून सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सिक्कीम दौऱ्यादरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी “सिक्कीम@५०: या कार्यक्रमात सहभागी होतील. तसंच राज्यातल्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही करतील. त्यानंतर पश्चिम बंगालमधल्या अलीपुरद्वार आणि कूचबिहार जिल्ह्यांमध्ये शहर गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी करणार आहेत. तसंच बिहारमध्ये पाटणा विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन, करकट इथं ४८ हजार ५...

May 26, 2025 8:13 PM

views 18

देशाच्या विकासासाठी आवश्यक प्रत्येक गोष्ट देशातच तयार व्हावी, ही काळाची गरज-प्रधानमंत्री

देशाच्या विकासासाठी आवश्यक सर्व गोष्टी देशातच तयार व्हाव्यात, ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी २०१४ मध्ये भारताचे प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज ११ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त गुजरातमधे दाहोद इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रेल्वे इंजिन प्रकल्पासह, सुमारे २४ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण मोदी यांच्या हस्ते झालं. देशातलं औद्योगिक उत्पादन आणि निर्यातही सातत्यानं वाढत असल्याचं त्यांनी सांगितल...

May 22, 2025 9:25 AM

views 28

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते १०३ अमृत भारत रेल्वेस्थानकांचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थानातल्या बिकानेर इथून देशातल्या १०३ अमृत भारत रेल्वेस्थानकांचं उद्घाटन करणार आहेत. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत या रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला असून स्थानिक संस्कृती आणि वारसा अधोरेखित करणारी सजावट इथं केली आहे. यात महाराष्ट्रातल्या १५, तर मुंबईतल्या चिंचपोकळी, परळ, वडाळा रोड आणि माटुंगा या चार स्थानकांचा समावेश आहे. १५ महिन्यांच्या कालावधीत ७१ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्चून या स्थानकांचा पुनर्विकास केला आहे.

May 20, 2025 6:02 PM

views 23

सर्वसमावेशकता हा भारताच्या आरोग्य क्षेत्रातल्या सुधारणांचा गाभा-प्रधानमंत्री

सरकारने आरोग्य सुविधांचं जाळं देशभरात उभं केलं असून सर्वसमावेशकता हा भारताच्या आरोग्य क्षेत्रातल्या सुधारणांचा गाभा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ५८ कोटी लोकांना आरोग्य विमा पुरवणारी आयुष्मान भारत ही जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना केंद्र सरकार राबवतं असं प्रधानमंत्री म्हणाले. स्वित्झर्लंड मधल्या जिनिव्हा इथं आयोजित जागतिक आरोग्य सभेला ते दूरदृश्यप्रणालीद्वारे संबोधित करत होते. ग्लोबल साऊथ देशांसमोर आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. भारतात हज...

May 13, 2025 7:37 PM

views 18

पाकिस्तानात दहशतवादी लपून राहू शकतील अशी जागा उरली नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून टिपण्याचं सामर्थ्य भारताकडे असून पाकिस्तानात दहशतवादी लपून राहू शकतील, अशी जागा आता  उरली नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  पंजाबमधे आदमपूर इथं हवाईदलाच्या तळावर ते आज सैनिकांशी संवाद साधत होते. ऑपरेशन सिंदूर मधे सेनादलांनी बजावलेल्या कामगिरीचा, सैनिकांच्या शौर्य, धैर्य आणि युद्धकौशल्याचा  त्यांनी गौरव केला. ऑपरेशन सिंदूर मुळे देशभरात अभिमान आणि एकीची भावना अधिक बळकट झाली, तसंच दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांना धडा मिळाला असल्याचं ते म्हणाले. &nb...

May 2, 2025 8:44 PM

views 29

किनारपट्टीवरची राज्यं आणि बंदरांची शहरं विकसित भारताच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावतील-प्रधानमंत्री

भारताच्या किनारपट्टीवरची राज्यं आणि बंदरांची शहरं विकसित भारताच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावतील, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. केरळात तिरुवअनंतपुरम मध्ये विळींजम इथं खोल पाण्यातल्या आंतरराष्ट्रीय बहुउपयोगी बंदराचं उद्घाटन आणि लोकार्पण आज मोदी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. आतापर्यंत भारतातली ७५ टक्के  समुद्र मार्गानं होणारी आयात ही देशाबाहेरच्या बंदरांवर होत होती. ही सर्व प्रक्रिया अत्यंत खर्चिक होती. आता या विळिंजम बंदरामुळे हा खर्च वाचणार असून त्याचा ...