May 2, 2025 3:28 PM

views 20

प्रधानमंत्री आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावरही जाणार असून, अमरावती इथं त्यांच्या हस्ते ५८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी होणार आहे. देशभरात जागतिक दर्जाची संरचना आणि संपर्क जाळे उभारण्याची वचनपूर्तीचा भाग म्हणून आंध्र प्रदेशातल्या सात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. तसंच सहा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि एका रेल्वे प्रकल्पाची पायाभरणीही ते करतील. या विकास कामांमध्ये विधानभवन, उच्च न्यायालय, सचिवालय आणि इतर प्रशासकीय इमारती तसंच...

May 2, 2025 1:39 PM

views 14

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केरळ, मध्य प्रदेशात विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण

किनारपट्टीवरची राज्यं आणि बंदरांची शहरं विकसित भारताच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावतील, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. केरळात तिरुवअनंतपुरम मध्ये विळींजम इथं खोल पाण्यातल्या आंतरराष्ट्रीय बहुउपयोगी बंदराचं उद्घाटन आणि लोकार्पण आज मोदी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. आतापर्यंत भारतातली ७५ टक्के  समुद्र मार्गाने होणारी आयात ही परदेशातल्या बंदरांवर होत होती. ही सर्व प्रक्रिया अत्यंत खर्चिक होती. आता मात्र, या विळिंजममुळे हा खर्च वाचणार असून त्याचा उपयोग केरळव...

April 30, 2025 4:31 PM

views 24

प्रधानमंत्री उद्यापासून महाराष्ट्र, केरळ आणि आंध्रप्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून महाराष्ट्र, केरळ आणि आंध्रप्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत.  मुंबईत उद्यापासून सुरू होणाऱ्या वेव्हज परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री करतील. शुक्रवारी ते केरळला रवाना होणार असून तिथं विळिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचं लोकार्पण करतील. त्यानंतर आंध्रप्रदेशातल्या अमरावती इथं प्रधानमंत्री ५८ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. तसंच सात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचंही उद्घाटन करणार आहेत.

April 25, 2025 10:13 AM

views 29

हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचा प्रधानमंत्र्यांचा इशारा

पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना, त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा केली जाईल, असा इशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला  आहे. ते काल मधुबनी इथे राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित जाहीर सभेत बोलत होते. माणुसकीवर विश्वास ठेवणारा प्रत्येक जण भारतासोबत आहे, असंही प्रधानमंत्री म्हणाले.    यह हमला केवल पर्यटकों पर नहीं हुआ है, देशके दुश्मनों ने भारत की आत्मा पर प्रहार करने का दुस्साहस किया है। मैं, मोहित, स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूँ किजिन्होंने य...

April 21, 2025 4:44 PM

views 26

सरकार आणि जनतेतली दरी कमी करण्याचं काम नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांनी करावं-प्रधानमंत्री

सरकार आणि जनतेतली दरी कमी करण्याचं काम नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांना करायचं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. १७व्या नागरी सेवा दिनानिमित्त दिल्लीत विज्ञान भवन इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केवळ नशिबाच्या जोरावर, कष्ट न करता यश मिळत नसतं,  बदलत्या काळाचा वेग लक्षात घेऊन तंत्रज्ञानाच्या  आधारे विकासाच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत असं ते म्हणाले. गेल्या १० वर्षात देशाने विविध विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून केलेल्या प्रगतीची उदाहरणं मोदी यांनी दिली.                   पीड...

April 8, 2025 8:36 PM

views 35

भारत आणि UAE यांच्यातले धोरणात्मक संबंध दृढ करण्यात दुबईची महत्वाची भूमिका-प्रधानमंत्री

दुबईचे युवराज आणि संयुक्त अरब अमिरातीचे प्रधानमंत्री शेख हमदन बिन मोहम्मद अल मकतुम यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यानी नवी दिल्लीत आज भेट घेतली.  भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातले धोरणात्मक संबंध दृढ करण्यात दुबईची महत्वाची भूमिका आहे, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे हे संबंध अधिक बळकट होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.    आज सकाळी युवराज शेख हमदन बिन मोहम्मद मकतुम यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच...

April 5, 2025 8:11 PM

views 42

प्रधानमंत्र्यांनी कोलंबोतल्या भारतीय शांती सेनेच्या स्मारकाला आदरांजली वाहिली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी कोलंबोतल्या भारतीय शांती सेनेच्या स्मारकाला आदरांजली वाहिली. यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी २०१५ सालच्या दौऱ्यादरम्यान या स्मारकाला भेट दिली होती. भारतीय शांती सैन्य १९८७ ते १९९० या कालावधीत श्रीलंकेत तैनात होतं. यादरम्यान या दलाचे एक हजार १६९ सैनिक शहीद झाले तर तीन हजारांहून अधिक सैनिक जखमी झाले होते. नंतर श्रीलंका सरकारने २००८ला या सैनिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे स्मारक बनवलं.

April 5, 2025 7:13 PM

views 27

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा श्रीलंका दौरा विधायक परिणाम देणारा-विक्रम मिस्री

अनुरा कुमारा दिसानायके यांनी श्रीलंकेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिला परदेश दौरा भारताचा केला होता तसंच दिसनायके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर श्रीलंकेला भेट देणारे मोदी हे पहिलेच राष्ट्रप्रमुख आहेत,  अशी माहिती परराष्ट्रव्यवहार विभागाचे सचिव विक्रम मिस्री यांनी दिली. दोन्ही राष्ट्रांमधले बंध दृढ असल्याचं यावरुन दिसून येतं असं ते म्हणाले. प्रधानमंत्री मोदी यांचा हा श्रीलंका दौरा विधायक परिणाम देणारा असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली. 

March 30, 2025 8:38 PM

views 37

छत्तीसगढमधे प्रधानमंत्र्याच्या हस्ते विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगढ मधे ३३ हजार सातशे कोटी रुपये पेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि  लोकार्पण केलं. बिलासपूर जिल्ह्यात मोहभट्टा इथं झालेल्या या कार्यक्रमात वीज निर्मिती, रस्तेबांधणी, रेल्वे, शिक्षण आणि गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश होता. आदिवासी भागाच्या विकासाकरता धरती आबा जनजाती उत्कर्ष अभियान सुरु झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. नक्षली उपद्रवाने त्रस्त भागात आता शांतीचं युग आलं असून त्या भागातल्या अनेक बंद पडलेल्या शाळा आता सुरु झाल्या आहेत असं ते म्ह...

March 11, 2025 8:15 PM

views 40

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर

मॉरिशसच्या दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला. द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ इंडियन ओशन असं या सन्मानाचं नाव आहे. प्रधानमंत्री मोदी यांना मिळालेला हा २१वा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.   भारतात पश्चिम भागात येणारी काही साखर मॉरिशसहून आयात होत होती. काळाच्या या टप्प्यावर भारत-मॉरिशस संबंधांची गोडी अजूनच वाढली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. याच कार्यक्रमात मोदी यांनी मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीन ...