May 22, 2025 9:25 AM May 22, 2025 9:25 AM
11
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते १०३ अमृत भारत रेल्वेस्थानकांचं उद्घाटन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थानातल्या बिकानेर इथून देशातल्या १०३ अमृत भारत रेल्वेस्थानकांचं उद्घाटन करणार आहेत. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत या रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला असून स्थानिक संस्कृती आणि वारसा अधोरेखित करणारी सजावट इथं केली आहे. यात महाराष्ट्रातल्या १५, तर मुंबईतल्या चिंचपोकळी, परळ, वडाळा रोड आणि माटुंगा या चार स्थानकांचा समावेश आहे. १५ महिन्यांच्या कालावधीत ७१ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्चून या स्थानकांचा पुनर्विकास केला आहे.