September 12, 2025 11:34 AM

views 48

प्रधानमंत्र्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा होणार साजरा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे या महिन्याच्या 17 तारखेपासून देशभरात सेवा पंधरवडा आयोजित करण्यात येणार आहे. काल नवी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही माहिती दिली. हा सेवा पंधरवडा महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीपर्यंत, दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात देशभर विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. पुण्यातही या निमित्तानं विविध कार्यक्...

July 6, 2025 8:21 PM

views 23

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी रिओ दी जानेरोमधे दाखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. अर्जेंटिनाचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री आज ब्राझीलला पोहोचले. तिथल्या भारतीय समुदायानं उत्साहात त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ब्रिक्स परिषदेसाठी ब्राझीलची राजधानी रिओ दी जानेरो इथल्या म्यूझियम ऑफ मॉडर्न आर्ट इथं पोचले, तेव्हा ब्राझीलचे अध्यक्ष लुईज इनॅशिओ लुला दा सिल्वा यांनी त्यांचं स्वागत केलं. ब्रिक्स शिखर परिषदेत जागतिक शासन सुधारणा, हवामान बदलाची आव्हानं, कृत्रिम बुद्धिमत्तेसह इतर अनेक विषयांवर विचारमंथन होणार आहे.

July 5, 2025 8:18 PM

views 34

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अर्जेंटिना दौऱ्यावर, अर्जेंटिनाच्या अध्यक्षांसोबत विविध सामंजस्य करारांची शक्यता

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्युनोस आयर्स इथं अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष हॅविअर मिले यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. त्यात व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य आणि औषधनिर्माण, संरक्षण आणि सुरक्षा, खाणकाम आणि खनिज संपत्ती यासारख्या मुद्द्यांवर सहकार्य कराराची अपेक्षा आहे. अर्जेंटिनाच्या भेटीनंतर, ते रिओ दि जानेरो इथं होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझील इथं रवाना होतील. त्यानंतर आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात ते नामिबिया इथं भेट देतील.  

July 4, 2025 8:39 PM

views 17

त्रिनिदादमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांना OCI कार्ड देण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

भारत हा जगभरातला तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्टअप हब असल्याचं गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पोर्ट ऑफ स्पेन इथं काढले. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाला संबोधित करताना ते बोलत होते. तत्पूर्वी विमानतळावर त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधल्या भारतीय समुदायाचा प्रवास धैर्याचा असून आपले पूर्वज भारतीय संस्कृतीचे वाहक आहेत असंही ते म्हणाले. त्रिनिनाद इथले भारतीय वंशाचे नागरिक आता ओवरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड साठी पात्र ठरतील अशी घोषणाही त्यांनी केली. या का...

July 4, 2025 2:42 PM

views 24

प्रधानमंत्री पाच देशांच्या दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात अर्जेंटिनाला भेट देणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात अर्जेंटिनाला जात आहेत. प्रधानमंत्री अर्जेंटिनाच्या राष्ट्रपती जेवियर मिली यांच्या आमंत्रणावर अर्जेंटिनाला भेट देत आहेत. ५७ वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्र्यांची अर्जेंटिनाला ही पहिली भेट आहे. या भेटीत दोन्ही देशांमधल्या सहयोग आणि भागीदारी वाढवण्याच्या उपायांवर चर्चा होईल. दोन्ही राष्ट्रांत चालू सहकार्य आणि सामायिक भागीदारीवर चर्चा होणार असून आर्थिक भागीदारी, खाण, ऊर्जा सुरक्षा आणि आण्विक ऊर्जा यांचा शांत वापर या क्षेत्रांमध्ये करा...

July 2, 2025 3:06 PM

views 25

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ५ देशांच्या दौऱ्यावर रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज घाना, त्रिनिदाद - टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील, नामिबिया या ५ देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. ते प्रथम घाना इथं जाणार असून उभयपक्षी हिताच्या अनेक मुद्द्यांवर बैठकांबरोबरच ते तिथल्या संसदेलाही संबोधित करणार आहेत. घानामधल्या भारतीय समुदायात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी उत्साहाचं वातावरण आहे. प्रधानमंत्री उद्या त्रिनिदाद टोबॅगो साठी रवाना होतील तिथे ते त्रिनिदादच्या राष्ट्रपती क्रिस्टिन कार्ला कांगालू आणि प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर यांची भेट घेतील. त...

June 29, 2025 8:46 PM

views 14

लोक-सहभागाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधे प्रतिपादन

लोक-सहभागाच्या ताकदीच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे तेविसाव्या भागात आज ते बोलत होते. आणीबाणी लादण्याच्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, देशात संविधान हत्या दिवस पाळला गेला त्याबद्दल ते बोलत होते. यासंदर्भात मोरारजी देसाई आणि अटल बिहारी वाजपेयी या माजी प्रधानमंत्र्यांनी आणीबाणीच्या निषेधात केलेल्या भाषणांचा अंश ही त्यांनी श्रोत्यांना ऐकवला. आणीब...

June 6, 2025 8:25 PM

views 28

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महिना अखेरीला कॅनडामध्ये होणाऱ्या जी-सेव्हन शिखर परिषदेला उपस्थित राहणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस कॅनडामध्ये होणाऱ्या जी- सेव्हन शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. जी- सेव्हन शिखर परिषदेसाठी कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी आमंत्रित केल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसंच कार्नी यांना निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि कॅनडामध्ये परस्पर आदर आणि हितसंबंधं असून दोन्ही देश नव्या जोमाने एकत्र काम करतील असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.

June 6, 2025 8:23 PM

views 21

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ११ वर्ष पूर्ण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ११ वर्ष पूर्ण झाली असून या काळात सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी सरकारनं विविध पावलं उचलली आहेत. ऐकूया एक आढावा…गेल्या दशकात भारताचा समृद्ध वारसा आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचं पुनरुज्जीवन झालं आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्त आयोजित आझादी का अमृत महोत्सवासारख्या मोहिमेअंतर्गत देशभरात सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित झाले. भारताच्या स्वातंत्र्यसेनानींचा सन्मान करण्यासाठी, त्यांचा वारसा जपण्यासाठी सरकारनं प्रयत्न...

June 2, 2025 8:14 PM

views 35

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो पेना पॅलासिओस यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय बैठक, संयुक्त आयोगाच्या स्थापनेसाठी उभय देशांमधे सामंजस्य करार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो पेना पॅलासिओस यांच्यात आज नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत व्यापार, संरक्षण, आरोग्य, रेल्वे, अंतराळ, कृषी, स्वच्छ ऊर्जा, हायड्रोजन आणि जैव इंधन या क्षेत्रांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. भारत आणि पॅराग्वे यांनी संयुंक्त राष्ट्रांसह विविध बहुपक्षीय संघटनांमध्ये समान हिताच्या मुद्द्यांवर काम करण्याची तयारी दर्शवली आहे. दोन्ही देश डिजिटलीकरण आणि माहितीआधारीत संवाद तंत्रज्ञान वाढवण्यावर काम करत आहेत.   यावेळी भारत आणि पॅराग्वे ...