March 7, 2025 12:57 PM

views 22

कोविड काळात धोरणात्मक नेतृत्वाबद्दल प्रधानमंत्री बार्बाडोस पुरस्काराने सन्मानित

कोविड महासाथीच्या काळात धोरणात्मक नेतृत्व आणि महत्त्वाच्या मदतीसाठी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बार्बाडोस या कॅरिबियन राष्ट्राच्या प्रतिष्ठित मानद ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. बार्बाडोसमध्ये ब्रिजटाऊन इथं झालेल्या समारंभात परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गारेटा यांनी प्रधानमंत्र्यांच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला.

January 2, 2025 1:55 PM

views 21

नवी दिल्लीतल्या ९०० कोटी रुपये पेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि पायाभरणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. जेजे क्लस्टर मधल्या रहिवाशांसाठी बांधलेल्या सुमारे १७ शे फ्लॅट्स चं ते उद्घाटन करतील, तसंच नवी दिल्लीतल्या अशोक विहार इथल्या पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या घराची चावी सुपूर्द करतील. दिल्लीतल्या दोन नागरी पुनर्विकास प्रकल्पांचं ते उद्घाटन करतील. द्वारका इथल्या सुमारे ३०० कोटी रुपये खर्चाच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एकात्मिक कार्यालय संकुलाचं उद्घाटनही ते करतील. दिल्ली विद्यापीठातल्या ६०० कोटी ...

December 25, 2024 8:13 PM

views 36

दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या शतकमहोत्सवी जयंतीनिमित्त देशाची आदरांजली

माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांची आजची शतकमहोत्सवी जयंती आपणा सर्वांसाठी सुशासनाची प्रेरणा घेण्याचा दिवस आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्य प्रदेशातल्या खजुराहो इथं देशातल्या पहिल्या, महत्त्वाकांक्षी आणि बहुद्देशीय केन-बेटवा राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या पहिल्या, ओंकारेश्वर तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाचं लोकार्पण, तसंच १ हजार १५३ अटल ग्राम सुशासन भवनांचं भूमिपूजनही मोदी यांनी य...

December 18, 2024 3:26 PM

views 22

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका

काँग्रेसने आतापर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अनेकदा अपमान केला असून आपली कृत्यं काँग्रेसला आता लपवता येणार नाहीत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. आंबेडकरांबाबतच्या विधानावरुन आज संसदेत गदारोळ झाला त्या संदर्भात त्यांनी समाजमाध्यमावर प्रतिक्रीया दिली आहे. काँग्रेस सत्तेवर असताना दलित समुदायातल्या अनेकांची हत्या झाली असा आरोप त्यांनी केला असून अनुसूचित जाती जमातींसाठी काँग्रेसने काहीही केलं नाही असंही मोदी यांनी म्हटलं आहे.

December 14, 2024 8:19 PM

views 33

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी मांडले ११ संकल्प

सन २०४७पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून उभं करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना ११ संकल्पांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.  सर्वांनीकर्तव्याचं पालन करणं, सर्वांच्या सहभागातून सर्वांचा विकास साधणं, भ्रष्टाचाराला अजिबात थारा न देणं, देशाच्या कायद्याचं अभिमानानं पालन करणं, गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर येणं, देशाचं राजकारण एकाच कुटुंबाच्या वर्चस्वातून मुक्त करणं, राज्यघटनेचा सन्मान करणं, राजकीय स्वार्थासाठी राज्यघटनेचा होत असलेला वापर थांबवणं, राज्यघटनेनं दिलेलं आरक्...

December 9, 2024 8:10 PM

views 33

सरकारनं गेल्या १० वर्षात महिला सक्षमीकरणासाठी अनेक अभूतपूर्व पावलं उचलली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

आपल्या सरकारनं गेल्या १० वर्षांमध्ये महिला सक्षमीकरणासाठी अनेक अभूतपूर्व पावलं उचलली असून यापुढेही महिलांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. ते हरियाणामधे पानिपत इथे बीमा सखी योजनेचा प्रारंभ करताना बोलत होते. हरियाणानं ज्या पद्धतीनं एक है तो सेफ है हा मंत्र स्वीकारला आहे, हे इतर राज्यांसाठी उत्तम उदाहरण असल्याचं ते म्हणाले. महिलांमध्ये आर्थिक साक्षरता तसंच विम्याविषयीची जागरूकता वाढावी, यादृष्टीनं ही योजना तयार केली आहे. आयुर्विमा महामंडळाच...

December 9, 2024 7:41 PM

views 21

तरूणांच्या कौशल्यविकासावर शासन भर देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारतात येणाऱ्या काळात तरुणांची संख्या सर्वात जास्त असणार असून या तरूणांच्या कौशल्यविकासावर शासन भर देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राजस्थानमध्ये जयपूर इथं होत असलेल्या रायझिंग राजस्थान या वैश्विक गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते संबोधित करत होते. तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या साहाय्यानं लोकशाही, लोकसंख्याशास्त्र आणि डेटा पॉवर या क्षेत्रांंमध्ये भारताची ताकत सध्या वाढली आहे. तसंच गेल्या दहा वर्षात भारत जगातली पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनली असून भारताच्या एफडीआय आण...

October 13, 2024 1:55 PM

views 35

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘अमुलाग्र बदल घडवणारा नेता’ – बोरिस जॉन्सन यांच्या नव्या पुस्तकात गौरवपूर्ण उल्लेख

ब्रिटनचे माजी प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी आपल्या नव्या पुस्तकात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘अमुलाग्र बदल घडवणारा नेता’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. जॉन्सन यांनी आपल्या पुस्तकाचा एक संपूर्ण अध्याय भारत - ब्रिटन संबंधांना समर्पित केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रुपानं ब्रिटनला मित्र लाभला आणि या मैत्रीमुळेच भारत - ब्रिटन मुक्त व्यापार कराराचा पाया रचला गेला, असं त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.

October 13, 2024 4:00 PM

views 34

प्रधानमंत्री गतीशक्ती बृहद आराखड्याला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे प्रंशसोद्गार

भारताच्या पायाभूत सेवा क्षेत्राचा कायापालट करण्यात एक परिवर्तनकारी उपक्रम म्हणून उदयाला आलेल्या पीएम गतीशक्ती ब्रृहद आराखड्याला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. गतिशक्ति उपक्रमानं देशाच्या मल्टीमोडल संपर्कव्यवस्थेला लक्षणीय चालना दिली असून प्रत्येक क्षेत्रात जलदगतीनं आणि कार्यक्षम विकास साध्य करण्यात मोलाचं योगदान दिलं आहे असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.    विविध भागधारकांच्या समन्वयामुळे लॉजिस्टिक्सला चालना मिळाली आहे...

October 10, 2024 6:52 PM

views 20

भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणामुळे आसियान देशांमधल्या परस्पर संबंधांना नवी ऊर्जा, गती आणि दिशा मिळाली – प्रधानमंत्री

भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणामुळे आसियान देशांमधल्या परस्पर संबंधांना नवी ऊर्जा, गती आणि दिशा दिली आहे, २१ वं शतक हे भारत आणि आसियान देशांचं शतक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. लाओस मधल्या व्हिएंतियान इथं भारत-आसियान शिखर परिषदेला ते संबोधित करत होते. भारत आणि आसियान देश हे शांतताप्रिय देश असून एकमेकांच्या सर्वभौमत्व आणि राष्ट्रीय एकात्मतेचा आदर करतात, जगाच्या इतर भागातले देश संघर्ष आणि तणावात असताना भारत आणि आसियान देशांमधली मैत्री, सहकार्य, संवाद आणि भागीदारी अत्यंत महत्वा...