डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो पेना पॅलासिओस यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय बैठक, संयुक्त आयोगाच्या स्थापनेसाठी उभय देशांमधे सामंजस्य करार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो पेना पॅलासिओस यांच्यात आज नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत व्यापार, संरक्षण, आरोग्य, रेल्वे, अंतराळ, कृषी, स्वच्छ ऊर्जा, हायड्रोजन आणि जैव इंधन या क्षेत्रांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. भारत आणि पॅराग्वे यांनी संयुंक्त राष्ट्रांसह विविध बहुपक्षीय संघटनांमध्ये समान हिताच्या मुद्द्यांवर काम करण्याची तयारी दर्शवली आहे. दोन्ही देश डिजिटलीकरण आणि माहितीआधारीत संवाद तंत्रज्ञान वाढवण्यावर काम करत आहेत.

 

यावेळी भारत आणि पॅराग्वे यांच्यात संयुक्त आयोगाच्या स्थापनेसाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यापूर्वी पॅराग्वेच्या अध्यक्षांनी राजघाटाला भेट देऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पित केली. ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेणार आहेत. पॅराग्वेला परतण्यापूर्वी ते मुंबईलाही भेट देणार असून या भेटीत ते राजकीय नेते, व्यावसायिक तसंच विविध उद्योगांचे प्रतिनिधी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या व्यक्तींची भेट घेतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा